आश्रम शाळेवर " लिपीक " पदांची नौकरी देतो, म्हणून 8 लाखाला फसविले ; अर्जदारांचे तक्रारीपत्राला, संबंधित अधिकाऱ्यांकडून दिरंगाई....
>>>>संस्थाचालकासह मंडळावर गुन्हा दाखल करण्यास चौकशीच्या नावाखाली टाळाटाळ, नुतन पोलीस अधीक्षक लक्ष देतील ?
औसा प्रतिनिधी /-औसा तालुक्यातील किल्लारी येथील आश्रम शाळेवर " लिपिक " पदाची नोकरी देतो म्हणून, 8 लाख रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तालुक्यातील किल्लारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असून गुन्हा दाखल करण्यास
अधिकाऱ्यांकडून दिरंगाई होत आहे. या बाबत लातूर पोलीस अधीक्षक यांना दि. 17 डिसेंबर रोजी अर्जदाराने तक्रार दिली असता नुसती चौकशी चालू आहे असे उत्तर प्राप्त झाले.
या प्रकरणातील अरोपी अद्यापही मोकाट असल्याचे बोलले जात आहे. याबाबत माहिती की, अर्जदार महमुद महबूब शेख रा. मोगा ता. लोहारा ह. मु. किल्लारी व मुसीन शेरमहमद शिरगापुरे रा. किल्लारी येथील असून मी व माझे भाऊजी दि. 1/6 /2016 रोजी र आं केंद्रीय अनुसूचित जाती निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा किल्लारी ता औसा या संस्थेचे सचिव संजय बबनराव कोटांगळे रा. फुरसुंगी पुणे यांनी मला आश्रम शाळेत ' लिपिक पदाची नौकरी देतो ' म्हणून 8 लाख रुपये दे ' तुला आश्रम शाळेवर, नौकरीस घेतो ' म्हणून 8 लाख रुपये माझ्याकडून घेतले व मला त्या आश्रमशाळेचे बनावट नियुक्तीपत्र देऊन माझी घोर फसवणूक केली आहे. सदर नोकरीच्या आमिषाला बळी पडल्याने आज माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही गरीब कुटुंबातील शेतकरी असून माझ्या घरातील सोनं-चांदी व माझ्या कुटुंबांच्या नावे असलेली जमीन गहाण ठेवत नौकरीसाठी पैसे ऊसने व्याजाने पैसे काढून रमाबाई आंबेडकर केंद्रीय अनुसूचित जाती निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा संस्थाचालकाकडे 8 लाख रुपये दिले आहे. याबाबत संस्था चालकास विचारणा केली असता संस्थाचालक तथा सचिव संजय बबनराव कोटांगळे रा. फुरसुंगी पुणे यांनी मला उडवाउडवीचे उत्तरे देत तुला नौकरीवर घेतले आहे म्हणून, खोटं बोलत संस्थेचे खोटे, बनावट नियुक्तीपत्र देऊन माझे पैसे लुटत फसविले आहे. ही घटना किल्लारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून याबाबत अद्याप गुन्हा दाखल झाला नाही, गुन्हा दाखल होण्यास टाळाटाळ होत आहे. या घटनेबद्दल संबंधित पोलीस प्रशासन अधिकांऱ्याना अर्जदाराने तक्रार अर्ज, दिले असता अद्याप त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. तक्रारी अर्जाला पोलीस प्रशासन टाळाटाळ करीत आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अर्जदारावर आज पर्यंत त्या संस्थेत कसल्याच प्रकारची नौकरी न मिळाल्याने माझ्यासह माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, अशा खोट्या जाहिराती देवून व नौकरीचे आमिष दाखविणऱ्यां संस्था चालकासह मंडळावर तसेच मंडळातील पुढील सदस्यांवर- ज्योती क्षीरसागर, दयानंद गायकवाड, आकाश सोपान लकडे, संजय बबनराव कोटांगळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असा अर्ज पोलीस निरीक्षक किल्लारी, उपविभागीय पोलीस अधिकारी औसा, व पोलिस महासंचालक नांदेड यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.