औसा तालुका रेल्वे हक्क संघर्ष समितीलाऔसा तालुका विधीज्ञ मंडळाचा जाहीर पाठिंबा

 औसा तालुका रेल्वे हक्क संघर्ष समितीलाऔसा तालुका विधीज्ञ मंडळाचा जाहीर पाठिंबा







औसा मुख्तार मणियार

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग औसा तालुक्यातून जाण्याची आपल्या संघर्ष समितीच्या रास्त मागणीला औसा तालुका विधीज्ञ मंडळाचा जाहिर पाठींब्यांचे पत्र  औसा तालुका रेल्वे हक्क संघर्ष समितीला दि पांच डिसेंबर २०२० शनीवार रोजी दिले आहे या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे

 आपणास मी औसा तालुका विधीज्ञ मंडळाचा अध्यक्ष या नात्याने औसा तालुका विधीज्ञ मंडळाच्या वतीने सध्या चालू असलेल्या लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग औसा तालुक्यातून जावे या मागणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्व पक्षीय सर्व सामाजीक कार्यकर्ते गठीत करण्यात आलेल्या औसा तालुका रेल्वे हक्क संघर्ष समितीला पाठींबा देत आहे.


सदरील प्रस्तावीत रेल्वेमुळे औसा तालुक्याचा व औसा शहराच्या विकासास हातभार लागणार असून तसेच सदर रेल्वे मार्गाचा प्रश्न हा तालुक्याच्या आस्मीतेच्या असल्यामुळे आपल्या संघर्ष समितीद्वारे या मागणीस शासकीय दरबारी करण्यात येणाऱ्या पाठपुराध्यास औसा तालुका विधीज्ञ मंडळाचा जाहिर पाठवा व सक्रीय सहभाग असल्याचे या पत्राद्वारे कळविण्यात येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या