जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून आलमला, ता. औसा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना २०२०-२१ अंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमाचे उदघाटन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले!
औसा मुख्तार मणियार
आज जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून आलमला, ता. औसा येथील शेतकरी श्री जीवन बसवंतराव पाटील यांच्या शेतात लिंबू झाडाची लागवड करून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना २०२०-२१ अंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमाचे उदघाटन केले. त्यांच्या दीड एक्कर क्षेत्रात लिंबूच्या झाडांची लागवड केली जाणार आहे.
मनरेगा अंतर्गत वैयक्तिक/सामुहिक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मी सातत्याने माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना करतो आहे. त्या आवाहनानुसार आलमला गावातील अनेक शेतकऱ्यांनी लाभासाठी अर्ज सादर केले आहेत. आत्तापर्यंत मनरेगा अंतर्गत आलमला येथे २५ एक्कर क्षेत्रात लिंबू लागवड झाली असून ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.