प्रभुराज प्रतिष्ठाण लातूरचा नाविन्य उपक्रम बालकांना उबदार कपडे वाटून मायेची उब.

 

प्रभुराज प्रतिष्ठाण लातूरचा  नाविन्य उपक्रम
        बालकांना उबदार कपडे वाटून  मायेची उब.







दि.०४.१२.२०२० रोजी प्रभुराज प्रतिष्ठाण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर च्या  वतीने   हिवाळ्यात  गरजू व वंचित लोकांना उबदार चादर वाटप करण्याचे उपक्रम हाती घेतला तसेच  सध्या कडाक्याची थंडी वाडत असल्याने प्रत्येकजण थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे परिधान करतात त्याच परिस्थिती लातूर शहरात कामानिमित्त घरदार सोडून  आणि निराधार लोक पालाचा आसरा घेत आपला संसार उभा करतात सध्या मंदीची लाट आणि लॉकडाऊन काळात हाताला काम न मिळाल्यामुळे येणारी दिवाळी ही सादेपणाने साजरी करत लहान बालकांना थंडी वाजू नये आणि त्यांची प्रकृती चांगली असावी थंडी पासून बचाव करण्याआठी त्या बालकांना उबदार कपडे  वाटप करण्यात आले. निपुटपणे थंडीत  कुडकुडत झोपत असत पण त्यांचे ही थंडीपासून बचाव व थंडीचा सामना करण्यासाठी प्रभुराज प्रतिष्ठाणने पुढाकार घेत बालकांना शोधत पालावरील बालकांना  उबदार कपडे  पांगरण्यात आले  तसेच   त्यांच्या अंगावर मायेची उबदार कपडे  पांगरण्यासाठी  सामाजिक बांधलकी जपून यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि जसे जमेल तसे सहकाऱ्याच्या साहाय्याने उबदार कपडे  वाटप करून कर्तव्य निभावण्याचा प्रयत्न केला.
  यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथा न्यायाधीश सुनीता कंकणवाडी, प्रभुराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष  अँड.अजय कलशेट्टी,अँड.सुरेश सलगरे,पुजा निचले,किरण खोबरे,अमर साळुंके,मनमोहन डागा,रवी घुगरे,दीपक सगर,  सौरभ कलशेट्टी,विष्णू गुरुडे,गोपाळ खंडागळे आदीनि परिश्रम घेतले.
            चला सामाजिक बांधलाकि जपुया.......
                                वंचित बालकांना मदत करूया........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या