सामान्य मानसाला आपलसं करणारे स्व:एन. बी.शेख*

 📰 _*सा.युवा मुस्लिम विकास परिषद*_🖋


📡📺🎙️ *सामान्य मानसाला आपलसं करणारे स्व:एन. बी.शेख*🎙️📺📡





*औसा:* - येथील कर्मयोगी नवाब साहेब ज्यांनी अत्यंत जिद्दीने व आत्मविश्वासाने शिक्षण क्षेत्रातील आपल्या जनसामान्याला शिक्षणाची दारे खुली केली कसे हि व कितीही संकटे  आली तरी त्याला धीराने आणि संयमाने तोंड देत आपले ध्येय गाठता येते हे हिंदुस्थान एज्युकेशन सोसायटीचे सर्वेसर्वा स्व. एन. बी. शेख साहेबांनी दाखवून दिले. औसा सारख्या छोट्या शहरात शिक्षणाची दारे उपलब्ध करून त्यात गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेता येईल याचा विचार शेख दाम्पत्याने केला. सुरुवातीची त्यांची वाटचाल अतिशय खडतर आणि काटेरी रस्त्यावरून होती. संकटकाळात त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी (खाला) खंबीरपणे उभ्या होत्या. नवाब साहेबांनी त्यांच्या दारापर्यंत आलेल्या कुठल्याच याचकाला रिकाम्या हाताने परत पाठविले नाही. 

 

      अनेक गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी त्यांनी भरीव मदत केली. खरे तर राजकारण हा त्यांचा पिंड नव्हता पण त्यांच्या स्वभावामुळे राजकारणी त्यांच्या जवळ यायचे. एखाद्यावर श्रद्धा ठेवली तर ती किती असावी याचेही ते उत्तम उदाहरण होते. कर्म करीत जायचे...परमेश्वर त्याचे मूल्यांकन करून त्याचे फळ आपल्या पदरात टाकतो यावर त्यांचा गाढ विश्वास होता. म्हणूनच ते कर्म करीत गेले आणि मागे त्यांच्या तसे परिणाम उमटत गेले. हिंदुस्थान एज्युकेशन सोसायटीचे वटवृक्ष आज आपण पाहतो, त्याच्या फांद्या राज्याबाहेर गेलेल्या दिसतात त्या वृक्षाला पाणी स्वतः साहेब आणि खाला यांनी आपल्या खांद्यावर घागर घेऊन घातले आहे. कल्पकता आणि दूरदृष्टी हे बडे साहेबांना लाभलेली दैवी देणगी होती. 


      जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या दरबारात नवाब सहाब यांना आदराचे स्थान होते. अनेक गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी निशुल्क शिक्षण दिले. खाला यांनी याच गरीब विध्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने भाकरी चुलीवर भाजून खाऊ घातल्या. साहेबाना शेतीची खूप आवड होती. शेतीत नवनवीन प्रयोग त्यांच्या हयातीत झाले. काळ्या मातीशी जुडलेली त्यांची नाळ सोन्याच्या शेजावर पहुडतानाही त्यांनी तुटू दिली नाही. अगदी त्यांना चालता येत नव्हते तरीही त्यांनी शेती आणि मातीशी दुरावा येऊ दिला नाही. साहेबांचे शहजादे डॉ. अफसर शेख यांच्यासाठी त्यांनी खूप मोठा फ्लॅटफॉर्म तयार करून ठेवला की येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा फायदा होईल. साहेबांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरणे कधीही शक्य नाही... 


साहेब आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात आहेत. स्मृती दिनाच्या निमित्ताने


            ✍ *अब्दुल समद  शेख* ✍ 

            _संपादक-मुस्लिम विकास परिषद_

         मोबाईल क्रमांक-+919423719957 

Email-ymvp.latur@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या