5 डिसेंबर पुण्यतिथी स्वतंत्रता सेनानी मौलाना हुसेन अहमद मदनी (र.अ.)

 5 डिसेंबर पुण्यतिथी

स्वतंत्रता सेनानी मौलाना हुसेन अहमद मदनी (र.अ.)




🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

स्वातंत्र्यासाठी केवळ ब्रिटिशांविरूद्धच नव्हे तर भारताची फाळणी हवी असलेल्या फुटीरतावाद्यांविरूद्ध लढा देणारे मौलाना हुसेन अहमद मदनी (र .अ.)यांचा जन्म 6  ऑक्टोबर 1879 मध्ये बांगर मऊ जिल्हा उननाव उत्तर प्रदेश येथे  झाला.

 आपल्या वडिलांचे नाव सय्यद हबीबुल्लाह रहमतुल्लाह अलयही होते


वडिलांनी वयाच्या तेराव्या वर्षी    हजरत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलयही यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेण्यासाठी देवबंद येथे पाठविले


  तसेच त्यांनी मक्का आणि मदिना येथे प्रवास केला, जिथे त्यांनी धार्मिक शिक्षण देण्यासाठी सुमारे 16 वर्षे घालविली आणि आध्यात्मिक विद्वान झाले.


रेशमी रुमाल आंदोलनाची नायक मौलाना शेखुल हिंद महमदउल हसन(र .अ.)यांच्यासमवेत त्यांनी 'रेशीम रुमाल आंदोलन मध्ये' भाग घेतला आणि त्यासाठी शेखुल हिंद (र .अ.) सोबत

 *सन 1916 मध्ये ब्रिटीश सरकारने त्यांना तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली*.


 सन 1920 मध्ये  माल्टा जेलमधून परतून आल्यावर  खिलाफत आणि असहकार चळवळीत सक्रिय भूमिका घेतली. त्यांनी तेथून बाहेर पडून स्वातंत्र्यासाठी लढा देण्यासाठी ब्रिटिश सैन्यातील भारतीयांना हाक मारली, ज्यासाठी देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना ताब्यात घेण्यात आले.


या प्रसंगी मौलाना सय्यद हुसेन अहमद मदनी रहमतुल्लाह अलयही यांना सलाम करणे देखील महत्त्वाचे आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हजरत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैही यांच्या पद चिन्हावर  व्यतीत केले.

 आणि जमीयत आणि कॉंग्रेसच्या व्यासपीठावरून त्यांनी जी  कामगिरी  केली ती सोन्याच्या अक्षरांनी लिहिणे योग्य आहे.  


सन 1920  मध्ये जमीअत उलेमा हिंदच्या अधिवेशनात ब्रिटिश सरकारशी असलेले सर्व संबंध व व्यवहार निषिद्ध आहेत असा निर्णय घेण्यात आला.ह्यासाठी  हे आवश्यक आहे  की

 ■ (१) शासकीय पदे सोडली पाहिजेत

 ■ (२) कौन्सिलचे सभासदत्व सोडून द्यावयास पाहिजे

 ■ 3) शत्रू इंग्रजांना व्यावसायिक लाभ होईल अशी कृती करू नये

 ■ 4) शाळा व महाविद्यालयां माध्यर शासकीय मदत स्वीकारली जाऊ नये.

 ■ 5)शत्रू असलेल्या इंग्रजांच्या सैन्यात  भरती होने निषिद्ध मानले गेले पाहिजे

 ■ 6) सरकारी कोर्टात आपली निजी  प्रकरणे दाखल करण्यात येऊ नये


  जुलै 1921 मध्ये कराची येथे खिलाफत चळवळीच्या बैठकीत हजरत मदनी रहमतुल्लाह अलाही यांनी  वरील सूचना जाहीर केल्या, ज्याला  मौलाना मोहम्मद अली जोहर, डॉ. सैफुद्दीन कीचले  यांनी पाठिंबा दिला.  याचा परिणाम म्हणून  हजरत मदनी रहमतुल्लाह अलैही  इत्यादींना अटक करण्यात आली.


 26 सप्टेंबर 1921कराची कोर्टात हजरत मदनी रहमतुल्लाह अलयही यांनी संपूर्ण निडरता व शौर्याने एक मोठे विधान केले आणि वरील प्रकरणांचा पुनरुच्चार केला आणि सांगितले की जर सरकार आपचे धार्मिक स्वातंत्र्य काढून घेण्यास तयार असेल तर ब्रिटीश सरकारच्या सैन्यात भरती होणे दुर्दैवी आहे.  तसे झाल्यास मुस्लिम आपले प्राण त्याग करण्यास तयार असतील.  आणि मी प्रथम व्यक्ती असेन जो आपला जीव  अर्पण करील.  या विधानानंतर मौलाना मोहम्मद अली जौहर यांनी हजरत उल मौलाना हुसेन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैही यांच्या हाताचे चुंबन घेतले.


मौलाना सय्यद हुसेन अहमद मदनी रहमतुल्लाह अलयही यांना विविध वेळेत चार वेळ जेलमध्ये टाकण्यात आले आणि संपूर्ण जीवन मध्ये ते साडेसात वर्ष देशाच्या स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये राहिले


हिंदू आणि मुस्लिम दोघेही ब्रिटिशांच्या अत्याचाराला तोंड देत होते आणि गुलामांसारखे आयुष्य घालवत होते म्हणून त्यांनी आवाहन केले की इंग्रजांविरूद्ध लढा देणे हीच योग्य कृती आहे. ब्रिटिशांना पराभूत करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी हिंदू-मुस्लिम यांच्यात परस्पर मैत्री व सौहार्द अधिक दृढ व्हावा, असेही त्यांनी जाहीर केले.


मीठाचा सत्याग्रह आणि नागरी अवज्ञा आंदोलनात मौलाना मदनीने(र .अ.) महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सण  1942 मध्ये भारत छोडो चळवळीच्या वेळी त्यांना तुरूंगात डांबण्यात आले होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला होता.


मौलाना मदनी(र .अ.)यांनी अखिल भारतीय मुस्लिम लीगच्या फुटीरवादी विचारसरणीला विरोध केला. जातीय द्वेषाची चिथावणी देणे शहाणपणाचे नाही आणि मुस्लिम लीगचा 'टू नेशन सिद्धांत लोकांच्या सामान्य हितासाठी धोकादायक आहे, असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी आपल्या भाषणे व लिखाणात मुस्लिम लीगच्या नेत्यांवर कडक टीका केली.


स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात लक्ष दिले. मौलाना  हुसेन अहमद मदनी (र .अ.)यांनी देवबंदच्या 'दार-उल-उलूम'चे शैक्षणिक व्यवस्थापन कार्य सुद्धा पहिले जेथे बालपणी त्यांचे शिक्षण झाले होते.   त्यांना 'शेख-उल-इस्लाम' म्हणून ओळखले जात असे. 


एप्रिल सन 1944 मध्ये बसरायु येथे जमियात उलमा हिंदची कॉन्फरन्स  बोलावण्यात आली होती. ह्या ठिकाण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या