लातूर दि.02/01/2021
केंद्र सरकारने देशातील शेतकर्याला आर्थिक सुबकता व स्थिरता निर्माण करून देण्यासाठी विविध कृषी कायदे मंजूर केेलेले आहेत. या संदर्भात पी.व्ही.नरसिंगराव यांच्या कार्यकाळात मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार व पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंगजी यांच्या कार्यकाळात मॉडल अॅक्ट शेतीमाल व फळे, मार्केट यार्ड बाहेर विकण्याचे धोरण राबविण्याचा विश्वास काँग्रेस पक्षाच्या लोकसभा जाहीरनाम्यात दिलेला होता. असे असतानाही राजकारणासाठी कृषी कायद्याला विरोध करून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या कायद्यासंदर्भातील सत्य माहिती जनतेला, शेतकर्याला, कार्यकर्त्याला देण्याच्या सुचना भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी.नड्डा साहेब व केंद्र सरकारच्यावतीने देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे “नवीन कृषी धोरण शेतकरी व देशाच्या हिताचे” या विषयावर माजी मंत्री व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांचे व्याख्यान 04 जानेवारी 2021 रोजी सोमवारी स्वामी विवेकानंद इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निक कॉलेज,कळंब रोड,एमआयडीसी,लातूर येथे सायंकाळी 6.00 वा. आयोजन करण्यात आलेले आहे. अध्यक्षस्थानी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून आ.गोपीचंद पडळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आ.रमेशअप्पा कराड, औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यु पवार, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, भाजपा संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार,भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, जननायक जिल्हा कार्याध्यक्ष निळकंठराव पवार आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा पक्षाच्यावतीने करण्यात आलेले आहे.
फेसबुक लाईव्ह प्रसारण...
माजी मंत्री सदाभाऊ खोत व माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे कृषी कायदा शेतकरी हिताचा या विषयावर 4 जानेवारी 2021 रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. या व्याख्यानाचे फेसबुक लाईव्हव्दारे प्रसारण केले जाणार आहे. त्यामुळे फेसबुक लाईव्हद्वारे प्रसारीत होणार्या व्याख्यानाचा लाभ भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते ,शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा असे आवाहन भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले आहे.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.