क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सावित्री उत्सव म्हणून देशभर साजरा केला जात आहे

 



आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सावित्री उत्सव म्हणून देशभर साजरा केला जात आहे. लातूर जिल्ह्याच्या पर्यावरण रक्षणाकरीता गेली ५८२ दिवस सातत्याने अविरत झटत असलेल्या सावित्रीच्या लेकींचा म्हणजेच ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सन्माननीय महीला सदस्यांचा लातूर महानगर पालिका उपायुक्त सौ. मंजुषा गुरमे मॅडम यांच्या हस्ते सन्मानपत्र देउन गौरव करण्यात आला. ॲड. वैशाली यादव-लोंढे, डॉ. विमल डोळे, पुजा निचळे, सुलेखा कारेपुरकर, कल्पना कुलकर्णी,  प्रिया नाईक, संजयादेवी गोरे, आशा आयचित, युगा कनामे, निकिता कावळे, मिनाक्षी बोंडगे, मोहीनी देवनाळे, सिया लड्डा, राजलक्ष्मी लड्डा यांचा सन्मानपत्र देउन सत्कार करण्यात आला. झाडांकरीता खड्डे खोदणे, झाडे आणणे, झाडे लावणे, झाडांना पाणी देणे, टॅकरचे पाइप धरून लांब पर्यंत चालणे, स्वच्छता मोहीम याद्वारे  ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या महीला सदस्यांनी अविरत ५८२ दिवस वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, स्वच्छता मोहीम करुन समाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे.  
याबरोबरच सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने अंबेजोगाई रोडवरील झाडांना ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या महिला सदस्यांद्वारे पाणी देण्यात आले.
यावेळी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे मार्गदर्शक श्री ओमप्रकाशजी झुरळेसर, सामाजिक कार्यकर्ते गौरव मदने, ॲड, सचिन हूळदळे, अर्जुन माने उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्याकरीता ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, गंगाधर पवार, रुषीकेश दरेकर, मनमोहन डागा, डी. एम. पाटील, मोईझ मिर्झा, 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या