स्व. कविता कांबळे यांच्या स्मरणार्थ स्वच्छता कर्मचार्यांचा सन्मान...
औसा प्रतिनिधी /-औसा येथील स्व. कविता शाहूराज कांबळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त नगर परिषदेच्या महिला स्वच्छता कामगारांचा सन्मान करण्यात आला. कोरोना विषाणूंच्या काळात आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलून संपूर्ण औसा शहराची स्वच्छता नगर परिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून केला. शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पोलिस, आरोग्य विभागासह स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही अत्यंत चांगले काम केल्याबद्दल महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मास्क, हॅन्डग्लोज, स्कार्फ, व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता कर्मचार्यांचा सन्मान केला. अण्णाभाऊ साठे संस्कृतिक सभागृह औसा येथे सोमवारी दि. 4 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन रणदिवे, नगरसेवक अॅड. मंजुषा हजारे, गोपाळ धानुरे, माजी न. प. सदस्य जयश्रीताई उटगे, पत्रकार राम कांबळे यांनी आपले विचार व्यक्त करून पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. कविता शाहुराज कांबळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते औसा नगर पालिकेच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. संयोजक तथा नगरसेवक अंगद कांबळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी सर्वश्री मच्छिंद्र पुंड, डॉ. श्रीमंत क्षीरसागर, शाहुराज कांबळे, लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष संभाजी शिंदे, जालींधर बनसोडे, नंदकुमार सरवदे, पवन कांबळे, प्रतिक कांबळे, सौ. गितांजली कांबळे, प्रल्हाद सरवदे प्रफुल्ल कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र बनसोडे यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.