राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
जेएसपीएम कॉलेजच्या भूमिपूजनाचे निमंत्रण
जेएसपीएम कॉलेजच्या भूमिपूजनाचे निमंत्रण
लातूर दि.07/01/2021
महाराष्ट्रामध्ये नामांकित असलेल्या जेएसपीएम लातूर शिक्षण संस्थेतर्फे पुणे, औरंगाबाद, नांदेड, लातूर जिल्ह्यात आपले वेगवेगळे शैक्षणिक युनिट अत्यंत गुणवत्तापूर्ण पध्दतीने चालविले जात आहेत. याच संस्थेने चालु शैक्षणिक वर्षात स्वामी विवेकानंदपूरम एमआयडीसी,लातूर शैक्षणिक कॅम्पसमध्ये स्वामी विवेकानंद महाविद्यालय आर्ट, कॉमर्स, सायन्स व स्वामी विवेकानंद आटीआय कॉलेजची सुरूवात केलेली आहे. या कॉलेजच्या ईमारतीचे भूमिपुजन व एम.एन.एस.बँकेच्या मायक्रो फायणांन्स कर्ज वाटप कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी लातूर येथील या कार्यक्रमाला येण्यास संम्मती दिली असल्याची माहिती जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली.
यावेळी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. यावेळी भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, अराईज क्लासेसचे संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर यांची उपस्थिती होती.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.