महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक कामगार संघटनेचा तिसरा वर्धापन दिवस उत्साहात साजरा

 दिनांक 1.1. 2021 रोजी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक कामगार संघटनेचा तिसरा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनी.संघटनेतर्फे अंबुलन्स लोकार्पण सोहळा, व कोरोना 19 वॉर्डांमध्ये काम केलेल्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना कोरोणा सन्मान पत्र देऊन सन्मानित

 करण्यात आले.तसेच जे कामगार मागील पंचवीस ते तीस वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करतात त्यांना सन्मानचिन्ह (ट्रॉफी) देवून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला मराठवाडा पाटबंधारे यांत्रिकी कामगार संघटना (इंटक)लातूरचे कार्याध्यक्ष एम एम जमादार व सरचिटणीस जरा पोतदार व अंधश्रद्धा निर्मुलन चे कार्यकर्ते व साहित्यकार, प्रकशजी घादगिने साहेब या थोर कामागर नेत्यांचा( शोल, क्षिरिफळ, व सन्माचिन्ह देवून सत्कार करण्यात आला).

तदनंतर कार्यक्रमामध्ये सर्व  नेते मंडळींनी अत्यंत प्रखर पने कमागरावरती  होणाऱ्या अन्ायाविरुध्द विरुद्ध लढा देण्याची खूप गरज आहे व त्या अनुषंगाने आपापले मार्गदर्शन केले त्या नंतर संघटनेची जिल्हा उपाध्यक्ष आनंद निळे यांनी खाजगी दवाखान्यातील कामगारांना किमान वेतन1948 अधिनियम नुसार सर्वांना मिळणे बंधन कारक आहे, व त्यांचे दरमहा पीएफ ही कापले जावे व हा त्यांचा न्याय हक्क अधिकार आहे असे विचार वर्धापदिनानि मांडण्यात आले.







या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन भाऊ कोळी यांनी वर्धापदिनानि आपले विचार मांडताना जो पर्यंत तमाम खाजगी दवाखान्यातील, कामगार( कर्मचारी) यांना किमान वेतन,पीएफ ( भविष्य निर्वाह निधी) जात नाही तो पर्यंत या संघटनेचा वैचारिक लढा चालूच राहील असे आवाहन वर्धापन दिनी करण्यात आले. व त्या नंतर   प्रसाद कोळी यांनी कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या