,बुधोडा येथे महिला शिक्षण दिन उत्साहात साजरा
औसा मुखतार मणियार
आज दि.०३/०१/२०२१ रोजी जि.प.प्रा.शाळा,बुधोडा येथे *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले* यांची जयंती *महिला शिक्षण दिन* म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी भारतीय स्त्रीला तिच्या अस्तित्वाची,सामर्थ्याची जाणीव करून देणाऱ्या आणि अक्षरबिजे पेरून मानवतेचा मंत्र देणाऱ्या सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी गावातील आशाताई सौ.कुसुम माळी,एसएमसी सदस्या सौ देवकते ताई आणि शाळेतील सर्व शिक्षिकांचा पुस्तक,पुष्पहार,पुष्पगुच्छ देवून यथोचीत गौरव करण्यात आला.
तसेच या निमित्ताने प्रत्येक शिक्षक व विद्यार्थी यांनी सावित्रीच्या कार्याविषयी एक पुस्तक वाचण्याचा संकल्पही करण्यात आला.आणि शाळेत निबंध गाणी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,प्रथम शिक्षिका असणाऱ्या सावित्रीबाईंचे योगदान,त्यांची स्त्री उद्धारासाठीची मुल्ये भावी पिढीसाठी कशी अत्यंत उपयोगाची आहेत हे आपल्या सहज आणि ओघवत्या मधुर वाणीत शाळेचे मुख्याध्यापक श्री युवराज घंटे सरांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली.
त्यानंतर कु.रुक्मिणी,संस्कृती,मोहिनी,आरती,प्रज्ञा,त्रिरत्न,साक्षी किरण...या मुलांनी भाषण,निबंध गाणी यात सहभाग नोंदवला.या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्रीमती कच्छवा सुषमा,श्रीमती पवार सुरेखा,श्रीमती साबदे वृषाली,श्रीमती गठ्ठडे सीमा यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचालन श्रीमती स्वामी जयश्री मॅमनी केले तर आभार मानून कार्यक्रमाची सांगता श्रीमती भारत कांबळे मॅडमनी केली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.