स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आ अभिमन्यु पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन
औसा प्रतिनिधी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती औसाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास औशाचे आमदार अभिमन्यू पवार हे उपस्थित राहून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले,
'अत्यंत खडतर परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या संघर्षाने स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली. आज महिला प्रत्येक क्षेत्रात जी नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत आहेत त्याचा पाया क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचला आहे' असे मनोगत यावेळी आ अभिमन्यु पवार यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला औशाचे पोलिस निरीक्षक एन, बि, ठाकुर, भाजप औसा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव,
समाज सेवक नारायण माळी, दौलत वाघमारे,दादा कोपरे, आदमखाँ पठाण, नवनाथ भोसले, आत्माराम मिरकले, राजेंद्र बनसोडे, तसेच प्रा,सोनाली गुळबिले, नगरसेविका मंजुषा हजारे,व संयोजक राम कांबळे, भागवत म्हेगे, चांगदेव माळी, समिती चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते!
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.