पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन
लातूर :- प्रति वर्षाप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूर च्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार आयोजन केले असून मराठी भाषेतील, कथा कविता, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, आत्मचरित्र पाठवून सहकार्य करावे. या पुरस्कार योजनेसाठी आपले साहित्य 01 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत प्रकाशीत झालेले असावे. आपले साहित्य दोन प्रतीत, पासपोर्ट अकाराचे दोन फोटो, सक्षिप्त परिचयासह दि. 28/02/ 2021 पर्यंत अकॅडमीचे सचिव प्रकाशघादगिने, राजलक्ष्मी निवारा, गगन विहार जवळ, विशाल नगर, लातूर मो. 9421695454 पाठवावे मुदतीनंतर आलेल्या साहित्यांचा विचार केला जाणार नाही.
स्पर्धेतील विजेत्यांना कथा कविता, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, आत्मचरित्र साहित्य प्रत्येक विभागवार प्रथम 1500/-, द्वितीय 1000/-, तृतिय 750/- रुपये रोख रक्कम, शाल श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात विशेष उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा गौरवही करण्यात येणार आहे.
तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त साहित्यीकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन अकॅदमीचे अध्यक्ष अॅड. एस.एन. बोडके, कार्याध्यक्ष प्रा. श्रीधर गाकयवाड, सचिव प्रकाश घादगिने, प्रा.डॉ. माधव गादेकर, आर.पी. गायकवाड, गोंडराज रावन आत्राम, बंकट पुरी, अर्जुन कांबळे, शिवाजी गायकवाड, डॉ. संजय जमदाडे, पांडूरंग कुसभागे, अॅड. अंगद गायकवाड, सौ. कुसूमताई बोडके, सौ. वंदना गादेकर आदींनी केले आहे. अधिक माहितीसाठी अकादमीचे सचिव प्रकाश घादगिने 9421695454 यांच्याशी संपर्क साधावा.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.