काँग्रेसचा भविष्यकाळ उज्वल
कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष वाढीचे काम करावे; हवे ते पाठबळ देऊ
पालकमंत्री अमित देशमुख
‘वंचित’चे प्रा़.सुधीर पोतदार यांच्यासह अनेकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
लातूर प्रतिनिधी : ४ जानेवारी २१ :
देशात बदलत चाललेले वातावरण लक्षात घेता अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला उज्वल भविष्य आहे. असे सांगून लातूर जिल्हा काँग्रेस पक्षाचा गड होता आहे आणि भविष्यातही अभेदय राहील येथे निष्ठावान कार्यकर्त्याला योग्यवेळी संधी मिळते त्यामूळे प्रत्येक कार्यकर्त्याने पक्ष पक्षाची ताकत वाढवण्यासाठी कायम सक्रीय रहावे असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले.
४ जानेवारी रोजी सायंकाळी येथील काँग्रेस भवनमध्ये येथे लातूर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित व्यापक बैठकीत राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख बोलत होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत औसा विधानसभेची निवडणुक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लढवलेले प्रा़.सुधीर पोतदार, खुदमीर मुल्ला यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला़. याप्रसंगी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, काँग्रेसचे प्रदेश सचिव अमर खानापूरे, अभय साळूंके, शकील शेख यांची प्रमुख उपस्थिती होती़.
औशात काँग्रेस पक्षाला जास्त शक्ती देणे आमचे कर्तव्य आहे, असे नमुद करुन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यावेळी म्हणाले की, देशात परिवर्तन घडले, लातूर जिल्हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे़. देशातील वातावरण लक्षात घेता काँग्रेस पक्षात येणाऱ्यांचा आता ओघ वाढला आहे़. लातूर जिल्हयात आणि औसा तालुक्यातही हेच चित्र दिसून आहे़. या परिस्थितीत निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीस प्राधान्य देणे आवश्यक आहे. आगामी काळात औसा नगरपालिकेच्या निवडणुकीत औसा नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाच झेंडा फडकायला हवा़ चाकुर, देवणी, जळकोट व शिरुर अनंतपाळ या चार नरगपंचायतींच्या निवडणुकाही आता लवकरच होत आहेत़. या निवडणुकीत काँग्रेसला भरघोस यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम करण्याची गरज आहे. परिश्रम करणाऱ्या या कार्यकर्त्यांना राज्यपातळीवरून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. सध्या होत असलेल्या ग्रामपंचयातीच्या निवडणुकांमधून काँग्रेस पक्षाच्या विचाराचे जास्तीत जास्त उमेदवार विजय झाले पाहिजेत़, कार्यकर्त्यांचे भविष्य पक्ष जिंकण्यात असते़ त्यामुळे पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यर्त्यांचे भवितव्य उज्जवल आहे़. जे काम करतील त्यांना संधी मिळणार आहे़ यात कुठलीही चुक होणार नाही़, ही खुणगाठ बांधून ठेवा़ पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुक जिंकण्याचे सुक्ष्म नियोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले़. तसेच कोरोना काळात ज्या कुटूंबाचा कर्ता आधारप्रमुख मृत्यू पावला आहे. त्या कुटूंबांना काँग्रेस दत्तक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आधार देण्याचे काम करावे असे आवाहनही त्यांनी यावेळभ् केले.
यावेळी श्रीशैल उटगे यांनी प्रास्ताविक केले़ अमर खानापूरे, अभय साळूंके, शकील शेख, प्रा़ सुधीर पोतदार, खुदमीर मुल्ला यांनी मनोगत व्यक्त केले़. प्रा़ सुधीर अनवले, पृथ्वीराज सिरसाठ, अॅड़ बाबासाहेब गायकवाड, दगडूसाहेब पडिले, प्रा़.एकनाथ पाटील, अॅड़.प्रदीपसिंह गंगणे, अॅड़.देविदास बोरुळे पाटील, मोहन सुरवसे, माजी नगरसेवक अॅड़ मु सामियद्दीन मुजीबोद्देन पटेल, सिकंदर पटेल, स्वयंमप्रभा पाटील, कमलबाई मिटकरी, सुलेखा कारेपूरकर, हकीम शेख, अविनाश बट्टेवार, अथरोद्दिन काजी, राजेसाहेब सवई, अॅड़.सुहास बेद्रे, अॅड़ शाहनवाज पटेल, अंगद कांबळे, जयराज कसबे, प्रविण पाटील, प्रविण सूर्यवंशी, गुलाब काळे, राठोड, पंडित कावळे, दत्ता मस्के, सचिन गंगावणे, अब्दुल्ला शेख यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते़ सुत्रसंचालन प्रा़ ओमप्रकाश झुरुळे यांनी केले़.
चौकट
थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्र्रेसची विजयी घोडदौड
काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, खासदार राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची विजयी घोडदौड सुरु आहे़ आगामी २०२४ मध्ये विधान सभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार असून विधान भवनावर काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला़
---------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.