एन.एस.यु.आय.शहर शाखेकडून सुरू करण्यात आलेल्या मोफत आभयासिकेचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ.

 

एन.एस.यु.आय.शहर शाखेकडून सुरू करण्यात आलेल्या मोफत आभयासिकेचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ.





 

लातूरला शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

लातूर प्रतिनिधी -

      महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लातूर शहरातील खाडगाव रोड भागातल्या दयानंद गेट परिसरात मोफत अभ्यासिकेची सुरुवात करण्यात आली आहे.सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत व्हीडी.अभ्यासिका एन.एस.यु.आय.शहर शाखेच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे . या मोफत अभ्यासिकेचा शुभारंभ सोमवार दिनांक २५ जानेवारी रोजी सायंकाळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण  सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

 यावेळी बोलताना ना.अमित विलासराव देशमुख म्हणाले कीलातूरची गरज ओळखून या परिसरात गरजू विद्यार्थ्यासाठी एन.एसयु.आय.ने सुरू केलेली अभ्यासिका कौतुकास्पद आहेलातूर शहराचे अर्थकारण हे शिक्षण क्षेत्राशी निगडित आसून लातूरची ओळख ही शिक्षणामुळे होऊ घातलेली आहेलातुरात आज जे शिक्षणाचे जाळे उभा राहिले त्याचे सर्व श्रेय आदरणीय विलासराव देशमुख यांना जाते आणि म्हणून आज मुंबई ,पुणे यानंतर लातूर ची एक वेगळी ओळख निर्माण झालीआता या पुढील काळात वैद्यकीय शिक्षणाचे जाळे लातूर मध्ये उभे राहावे असा आपला संकल्प असून यासाठी लातूर वासियांचे आशीर्वाद यापुढे राहावेत असे ते म्हणाले.

पुढे बोलताना ना.अमित विलासराव देशमुख म्हणाले कीआजवर शिक्षण क्षेत्रासाठी जे वातावरण लातुरात उभे राहिले तसे भविष्यात वैद्यकीय शिक्षणाच्या देखील वातावरण निर्माण करणे हा उद्देश आसून याची सुरुवात लातुरात झाली आहेलातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकिय महाविद्यालय व्हावे अशी मागणी होत असून नुकतेच उस्मानाबाद जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालेयापुढे सिंधुदुर्गरायगडसातारापरभणी या जिल्ह्यात देखील वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी देण्यात येत आहे  . या माध्यमातून जागतिक दर्जाशी सुसंगत अशी सुसज्ज आरोग्य यंत्रणा असावी यासाठी पावले टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे.  येत्या काळात लातूर जिल्ह्यासह मराठवाडा  महाराष्ट्रासाठी बरीच कामे करायची आहेत७०/३० च्या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षणात समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न असून या निर्णयाच्या विरोधात अनेकजण न्यायालयात गेले मात्र अशा याचिका न्यायालयांनी फेटाळत  शासनाची भूमिका उचलून धरली आहे.  याचा फायदा आज वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होतोयया पुढील काळात राजस्थान मधील कोटा प्रमाणे  महाराष्ट्रात लातूर शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित केले जाईल  असे ना.अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी सांगितलेएन एस यु आय अभ्यासिकेचे साठी एक लाख रुपयांची पुस्तके देण्याची घोषणाही पालकमंत्री यांनी यावेळी केली.

दरम्यान या अभ्यासिकेसाठी पुस्तके खरेदी करण्यासाठी दीपक सूळ यांच्याकडून ४२ हजार रुपयांचा धनादेश शरद देशमुख यांना सुपूर्द करण्यात आलातसेच शिक्षण क्षेत्रातील गुणवंताचा देखील गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मान यावेळी ना.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे  यांनी एन.एस.यु.आय.कडून सुरू करण्यात आलेल्या व्हीडी.अभ्यासिकेला शुभेच्छा देत या अभ्यासिकेसाठी २१ हजार रुपयांची पुस्तके भेट देण्याचा शब्द दिलाडॉ सतीश यादव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले

प्रारंभी एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष शरद देशमुख यांनी प्रास्ताविक केले यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडेअखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगेशहर जिल्हाध्यक्ष ऍड.किरण जाधवदीपक सूळ,लक्ष्मण कांबळेअय्युब मणियारदत्ता सोमवंशीसूर्यकांत कातलेऍड.शरद जाधवनागसेन कामेगावकर,रत्नदीप अजनिकरऍड.फारुख शेखमोहन सुरवसेसुंदर पाटील कव्हेकरसचिन गंगावणेप्रवीण पाटीलसुपर्ण जगतापप्रा.डॉ.सतीश यादवयुनूस मोमीनमहेश काळे,प्रदीप सिंह गंगनेप्रवीण कांबळेआनंद भाई वैरागेप्रवीण सुर्यवंशी,विजय टिकेकरअविनाश बट्टेवार यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवरप्रतिष्ठित नागरिकपक्ष पदाधिकारीसदस्यमहाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

                                              ----------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या