राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यालय, अंबाजोगाई रोड येथे सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. लक्ष्मणराव शिंदे , जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांचा सत्कार

 

लातूर- भारतीय गणतंत्र दिनानिमीत राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यालय, अंबाजोगाई रोड येथे सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. लक्ष्मणराव शिंदे , जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांचा सत्कार

विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.
 महाराष्ट्र शासन विरूध्द सुनिल व इतर या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय लातूर येथील न्यायालयात राज्य परिवहन मंडळाच्या
 कर्मचार्‍यानां न्याय मिळवून दिला याबददल हा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, मी शासनाच्या वतीने लातूर न्यायालयात काम करीत आहे. शासनाच्या वतीने काम करत असताना एस.टी महामंडळाचे कर्मचारी एस.टी ड्रायव्हर नितीन हवालदार यांना ते कुर्डुवाडी डेपोची एस.टी बस घेवून नांदेडकडे निघाले असता
 मुरूड-अकोला शिवारात दादा पेट्रोलपंपाजवळ मारहाण करण्यात आली. सदरचा खटला न्यायालयात चालला. न्यायालयाने शासकीय कामात अडथळा केल्याबददल दोन आरोपींना एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. हे सांगुन भविष्यात एस.टी कर्मचारी यांना जाणून बुजून दृष्ट प्रवृतीच्या व्यक्ती त्रास देत असतील तर त्यांच्या विरूध्द मी व आमची सर्व सरकारी वकीलांची टिम सदैव आपल्याबरोबर राहुन न्याय देण्याचा प्रयत्न करतील. तसेच विभागीय कार्यालयातर्फे एक कर्मचारी नेमुन आम्हास सरकारी वकीलांना पेहरवी केली तर त्याचा परिणाम चांगला होवून अशा लोकांना शिक्षा देण्यास मदत होईल. तसेच गणंतत्र दिनाच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या