26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी सैनिकांचा भव्य सत्कार
औसा मुखतार मणियार
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने श्री गुलाबराव वामनराव पाटील यांचा सपत्मीक व श्री विठ्ठल माधव राऊत यांचा सपत्मीक शासकीय विश्रामगृहात औसा तालुक्यात प्रथमच सत्कार करण्यात आला.अॉ. कॅप्टन गिरी साहेब जिल्हाध्यक्ष, माजी सैनिक संघटना यांचा सत्कार सुधाकर माळी तालुका अध्यक्ष महात्मा फुले समता परिषद यांनी केला. तसेच दुसरे अॉ. कॅप्टन श्री कमलाकरजी सूर्यवंशी तालुका अध्यक्ष माजी सैनिक संघटना यांचा सत्कार मदन सिंह बिसेनी जिल्हा उपाध्यक्ष अखिल भारतीय समता परिषद यांनी केला. कॅप्टन सूर्यवंशी साहेब यांचा सत्कार कालिदास माळी यांनी केला. डांगे साहेब यांचा सत्कार किशनराव कोलते यांनी केला. सुभेदार चव्हाण यांचा सत्कार विजय कदम तालुका संघटक यांच्या हस्ते केला. डांगे साहेबांचा सत्कार केवलराम गुरुजी यांनी केला. यावेळी या कार्यक्रमास श्री दत्तात्रय माळी, माणिकराव फुटाणे, नवनाथ भोसले, रामहरी माळी, गोपाळ म्हेत्रे, विजय कदम, गणेश तेलंगे, रविकांत खुरपे, एडवोकेट नितीन म्हेत्रे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी मदन सिंह बिसेनी जिल्हा उपाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आभार मानले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.