लातूरकरांनी दिलेले प्रेम कायम आठवणीत राहीलः जी.श्रीकांत

 

 लातूरकरांनी दिलेले प्रेम कायम आठवणीत राहीलः जी.श्रीकांत          

 शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रम  राबवणारःजिल्हाधिकारी पृथ्वीराज.बी.पी.      





     

लातूर (प्रतिनिधी)लातूर क्रेडाई च्या वतीने लातूरचे नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचा स्वागत समारंभ तर.जी. श्रीकांत (भा.प्र.से.)यांचा निरोप समारंभ हॉटेल ग्रँड येथे संपन्न झाला यावेळी व्यासपीठावरती सत्कार मूर्ती.जी.श्रीकांत.लातूरचे नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून क्रेडाई चे राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया.लातूर क्रेडाई चे अध्यक्ष धर्मवीर भारती.सुबोध बेळंबे,आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.आपल्या सत्काराला उत्तर देताना.जी.श्रीकांत म्हणाले की लातूर करांनी दिलेले प्रेम माझ्या कायम आठवणीत राहील.माझ्या हृदयामध्ये लातूर करांसाठी वेगळे स्थान आहे मी कुठेही असलो तरी लातूर ला विसरणार नाही.याही पुढे भविष्यामध्ये लातूर करांचा जिव्हावा माझ्या सोबत कायम राहिल. माझ्या वर लातूर करांचा वेगळा हक्क कायम राहिल असे.भावोद्गार आपल्या मनोगतात त्यांनी व्यक्त केले तर नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. म्हणालेकी लातूरची महाराष्ट्रामध्ये वेगळी ओळख आहे .लातूर जिल्ह्याला सामाजिक.सांस्कृतिक.शैक्षणिक  राजकीय वारसा लाभलेला आहे . एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर लातूर करांनी केलेल्या प्रेमाची चर्चा राज्यातच नव्हे तर देशात आहे.याच लातूर जिल्ह्याचा मी एक म्हत्वाचा भाग आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. परभणी जिल्हायात शैक्षणिक क्षेत्रात केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम लातूर जिल्ह्यातही राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी सागितले .कार्यक्रमाचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया आपल्या भाषणात म्हनालेकी मी पुण्याचा जरी असलो तरी माझे प्रेम लातूर वर जास्त आहे.राज्याच्या क्रेडाई मध्ये सुद्धा आपल्या कामाच्या कौशल्यातुन.लातूर क्रेडाईचे अध्यक्ष धर्मवीर भारती यांनी लातुर पॅटर्न निर्माण केला आहे.लातूर हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करणारे शहर आहे . यावेळी त्यांनी जी श्रीकांत व जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.  यांच्या  बद्दल गौरव उदगार काढले या.सत्कार समारंभात जी.श्रीकांत यांचा सहकुटुंब हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला.तर नुतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांचाही स्वागत समारंभ यावेळी संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर क्रेडाई चे अध्यक्ष धर्मवीर भारती यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय महेश नावंदर यांनी करून दिला.सूत्रसंचलन अनिल पुरी यांनी केले तर आभार उदय पाटील यांनी मांडले.कार्यक्रमाला लातूर क्रेडाई चे जगदीश कुलकर्णी.श्रीकांत हिरेमट.उदय पाटील.महेश नावंदर.नागनाथ गिते.अमोल मुळे.सुबोध बेंळबे.विष्णू मदने.संतोष हत्ते.जयकांत गित्ते.भागवत खंडापुरे.मुन्नाराजे.दिपक शिवपुजे.दत्ता परशुराम.आशिष कामदार.बजरंग भुतडा.नितीन मंदाडे.नितीन शेटे.कमलकिशोर धुत.वशीम शेख.विकी अग्रवाल.आदी क्रेडाई पदाधिकार्याची सहकुटुंब  उपस्थिती होती.हा कार्यक्रम पुर्णपणे यशस्वी करण्यासाठी दिपक कोटलवार.अजय राजपुत जगदीश धुत.विशाळ अग्रवाल.सचिन मुंढे.वोनेश अग्रवाल.विक्रम सौदागर.विपीन अग्रवाल.ऋषीकेश शिन्दे.अशोक राठोड.दत्ता मोरे.ज्ञानेश्वर मिठ्ठापल्ले.विनायक जटाळ.श्रीकांत हेड्डा.राज बरुरे.चेतन पंढरीकर.आनंद लाहोटी.किरण मंत्री नितीन मालु.कांनडे आदींनी सहकार्य केले.या कार्यक्रमाला उदगीर क्रेडाई चे पदाधिकारी पण संस्खेने उपस्थित होते.                     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या