औसा शहरात व परिसरात वाढत असलेल्या चो-यांना व दरोडेखोरांना गजाआड करावे;औसा शहर कॉंग्रेस कमिटीची मागणी
औसा मुखतार मणियार
औसा शहरातील व परिसरातील चो-यांना व दरोडेखोरांना गजाआड करावे अशी मागणी औसा शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने दि.22 जानेवारी 2021 शुक्रवार रोजी सायंकाळी औसा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एन बी ठाकूर यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे. गेल्या काही महिन्यापासून औसा शहरात व परिसरात चोरांनी व दरोखोरांनी सुळसुळाट माजवला आहे. अनेक ठिकाणांच्या घरफोड्या करुन लाखो रुपयाची। लुट, सोने चांदी, लुट व काही लोकांना करुन औसा शहरात व परिसरात हात साफ करुन घेण्याचे सत्र सुरुच ठेवलेले आहे. याकडे आपले स्थानिक पोलीस प्रशासन लक्ष देत नसल्याचे वारंवार औसेकरांमध्ये चर्चा आहे व जनसामान्यातून पोलीस प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे. गेल्या 8 दिवसात औसा शहरातील माजी सैनिकाचे घरात चोरी च परवा आणखीन एक माजी सैनिकाच्या घरात दरोडा टाकण्यात आलेला आहे. ज्यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी या सर्व बाबींकडे आपण गांभीर्याने लक्ष देऊन त्वरीत चोरांना गजाआड करावे व जनतेला दिलासा द्यावा व कायदा व सुव्यवस्था योग्यपणे हाताळावी. अशी मागणी औसा शहर कॉंग्रेस पक्षाच्या वतीने औसा पोलिस निरीक्षक यांना एका निवेदनाद्वारे केली आहे यावेळी औसा शहर कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री शैल्य उटगे, शहराध्यक्ष शेख शकील, अमर भैया खानापूरे, हणमंत राचट्टे, शाहनवाज पटेल,खुंदमीर मुल्ला,मुज्जमील शेख,माजीद काझी, मौलाना कलीमुल्ला, अॅड.समीयोद्दीन पटेल, गुलाब शेख,अंगद कांबळे, मंजुषा हजारे, दिपक राठोड,जयराज कसबे आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.