कर्नाटकातील लेक व महाराष्ट्रातील सुनेला ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यास निवडणूक विभागाची बंदी का?

 कर्नाटकातील लेक व महाराष्ट्रातील सुनेला ग्रामपंचायत निवडणूक  लढवण्यास निवडणूक विभागाची बंदी का? 

 

 लातुर :प्रतिनिधी :







सध्या महाराष्ट्रात  राज्यात         ग्रामपंचायतिच्या निवडणूका लागलेल्या असून काही दिवसांपूर्वी च  लातुर जिल्हातील  बऱ्याच गावातील आरक्षणाची सोडत सुटलेल्या होत्या पण निवडणूक विभागाने आरक्षण रद्द करून  अगोदर  निवडणूक मग आरक्षण हा फार्मूला आवलंबला आहे त्या मुळे  अनेक पॅनल प्रमुखाचे दणाणले आहेत . अशातच औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे अनुसूचित राखीव असलेल्या वॉर्डात   भाग्यश्री लक्ष्मण कांबळे या ग्रामपंचायत तपसे चिंचोली येथे  निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असता फार्म भरण्यासाठी औसा तहसील कार्यालयात गेले असता त्यांचे  कर्नाटकातील बसवकल्याण तालुक्यातील जातीचा दाखला आहे व त्या जातीच्या दाखल्यावरून महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक लढवता येत नाही असे म्हणत निवडणुकीचा अर्ज बाद करण्यात आला 

सविस्तर वृत्तांत असा की

मी लक्ष्मण  कांबळे जात महार राहणार तपसे चिंचोली ता औसा जिल्हा लातुर येथील  रहिवाशी असून मी माझे लग्न कर्नाटकातील बसवकल्याण तालुक्यातील एकंबा  गावातील हणमंत दरगु गायकवाड जात महार  यांची  मुलगी भाग्यश्री ही चे सोबत दिनांक २५/०५/२००५/ रोजी  तपसे चिंचोली येथे लग्न करण्यात आले होते आज आमच्या लग्नाला जवळपास १५ वर्ष झालेले आहेत .लग्न झालेल्या प्रत्येक महिलेला तिच्या लग्नाच्या नंतर वडिलांचे नाव न लावता पतीचे नाव लावणे हे परंपरा असून त्या प्रमाणे  मी 

माझी पत्नी भाग्यश्री च्या नावा पुढे लक्ष्मण कांबळे हे नाव लावण्यात आले

म्हणजेच उदाहरणात मतदान यादीत आधार कार्ड  बँक पासबुक  रेशनकार्ड 

आदी कार्डावर पतीचे नाव नोंद करण्या आलेली आहे  इ स २०२० डिसेंबर  रोजी महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या  निवडणुका लागलेल्या आहेत  त्या मुळे मी  लक्ष्मण कांबळे माझी पत्नी भाग्यश्री लक्ष्मण कांबळे  हिला ग्रामपंचायत तपसे चिंचोली येथील अनुसूचित जाती वॉर्ड क्रमांक( १) मधून निवडणुकीत च्या रिंगणात उभा करण्यासाठी औसा तहसील कार्यालयात फार्म भरण्यासाठी  भाग्यश्री हिच्या माहेरकडील जातींच्या दाखल्या च्या आधारावर   निवडणुकी साठी  फॉर्म भरण्यासाठी गेलो असता निवडणूक  विभागाने कर्नाटकातील  महिलेला निवणुकीसाठी महाराष्टातील ग्रामपंचायत साठी निवडणूक लढवता येत नाही  हा निवडणूक विभागाचा जी आर आहे म्हणत  भाग्यश्री लक्ष्मण कांबळे हिचा अर्ज  स्वीकारला गेला नसले मुळे निवडणूक विभागाने भाग्यश्री कांबळे याचे वर केलेला हा एक अन्याय आहे 

ह्या  निवडणूक विभागाला माझे महाराष्ट्रात लोकसभा असेल  विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल या साठी माझ्या पत्नीचे मत चालते तर मग माझ्या पत्नीला ग्रामपंचयात ला  निवडणुक का ? लढवता येत नाही 

 याचा निवडणूक विभागाने त्वरित याचा खुलासा द्यावा   अन्यथा  मतदानावर बहिष्कार टाकु  असा इशारा भाग्यश्री कांबळे  हिचे पती  लक्ष्मण कांबळे भिम आर्मीचे जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे यांनी  इशारा दिला आहे

【 या वरील विषयावर त्वरित निर्णय घेण्यात यावा  जोपर्यंत निर्णय येत नाही तो पर्यन्त निवडणुकीवर बंदी घालण्यात यावी ) अशी मागणी  महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त तसेच मुख्यमंत्री व निवडणुकीच्या  संबंधित सर्व  विभाग याचे कडे ई-मेल द्वारे  पाठवलेल्या निवेदनात  मागणी  केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या