नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांच्या हस्ते अखिल भारतीय भजनी मंडळला मदत

 नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांच्या हस्ते अखिल भारतीय भजनी मंडळला मदत







औसा मुखतार मणियार

औसा शहरात वारकरी मंडळासाठी एक वारकरी भवन उभारण्याचे आश्वासन नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी दिले. भविष्यात वारकरी मंडळाच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या औसा तालुका कार्यकारिणीचे नियुक्ती पत्र वितरण व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख हे होते. प्रमुख पाहुणे मराठा समाज अध्यक्ष प्रदीप मोरे, सरपंच अमोल पाटील, औसा शहर कमिटीच्या अध्यक्षा सरोजनी कठारे, सचिन शिंदे यांची उपस्थिती होती. प्रस्ताविक अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अवसा तालुका अध्यक्ष ह भ प कुमार पाटील महाराज यांनी केले. यावेळी वारकरी मंडळाच्या संघटनेच्या माध्यमातून कामाची माहिती दिली. औसा तालुक्यात 125 शाखा व 10हजार वारकऱ्याचे संघटन केल्याची माहिती देण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. डॉक्टर अफसर शेख यांनी औसा हे ऐतिहासिक व सामाजिक सलोखा राखणारे शहर असल्याचे सांगितले. शहरातील भजनी मंडळाला अफसर शेख युवा मंचच्या वतीने साहित्यासाठी 10हजार रुपये व लहान मंडळाला 5 हजार रुपये देण्याची घोषणा केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारुती दादा सगर, नागनाथ दळवे, वसंतराव सर्जे, सरोजना कठारे, भारत बाई औटी, शिवाजीराव बागल, योगीराज वळके, व्यंकटराव माने आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या