पञकारांच्या वेदना जाणून घेण्यासाठी लोकप्रतिनिधीनीनी डोळस होण्याची गरज ---आ.निलंगेकर

 पञकारांच्या वेदना जाणून घेण्यासाठी लोकप्रतिनिधीनीनी डोळस होण्याची गरज ---आ.निलंगेकर






निलंगा/प्रतिनिधी 


पञकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पञकार हे लोकांच्या वेदना मांडता त्याना न्याय मिळवून देतात.परंतु त्यांच्या सुध्दा वेदना व समस्या असतात त्या आपण सर्व लोकप्रतिनिधीनी जाणून घेऊन डोळस होण्याची गरज असल्याचे मत माजी मंञी तथा आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले.


निलंगा तालुका पञकार संघाच्या संपर्क कार्यालयाच्या कार्यक्रमात   ते बोलत होते.नवीन पञकार संपर्क कार्यालयाचे त्यानी फित कापून उदघाटन केले.यावेळी निलंगा पञकार संघाच्या वतीने सरस्वतीची मुर्ती देऊन त्यांचा सर्व पञकारांनी सत्कार केला.


यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे हे होते तर प्रमुख पाहूणे अजित माने चेअरमन दगडू सोळुंके संजय मिलिंदा लातूरे  दोरवे  पो.नि.अनिल चोरमले पञकार संघाचे अध्यक्ष राम काळगे सचिव झटींग म्हेञे इत्यादी उपस्थित होते.


पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले शहरात नवीन पञकार भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून भव्य पञकार भवन बांधून देण्याचे अश्वाशन यावेळी त्यानी दिले व संपर्क कार्यालयासाठी ३ लाख रूपयांचा निधी देण्याचा शब्द दिला.तसेच अनेक विषयाला हात घालत त्यानी शहरातील समस्या व नगरपालिकेने केलेली विकास कामे यावर माहिती दिली.संपूर्ण शहराला चोविस तास पाणी पुरवठा करणारी मराठवाड्यातील एकमेव निलंगा  नगरपालिका असल्याची माहिती दिली.पञकार संघाच्या  प्रत्येक अडचणीत मी सदैव पाठीशी राहीन,पञकार आणि या तालुक्यातील जनतेमुळेच  मला राज्याचा मंञी म्हणून काम कराण्याची संधी मला मिळाली हे मी विसरणार नाही.


यावेळी नगरसेवक इरफान सय्यद बांधकाम सभापती  महादेव फट्टे शरद पेठकर तुकाराम माळी विष्णू ढेरे शेषराव ममाळे अॕड नारायण सोमवंशी प्रा.दयानंद चोपणे विलास सुर्यवंशी अरूण साळुंके अदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पञकार संघाचे उपाध्यक्ष माधव पिटले,मोईज सितारी, नाना रामदासी श्रीशैल्य बिराजदार विशाल हालकीकर अभिमन्यु पाखरसांगवे शिवाजी पारेकर  साजीद पटेल अयुब बागवान अदीसह पञकार संघाचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या