बोगस वॉशिंग पावडरवाल्यानी "घर धो डाला "औसा शहरात चोरी चे सत्र सुरुच

 बोगस वॉशिंग पावडरवाल्यानी "घर धो डाला "औसा शहरात चोरी चे सत्र सुरुच 






औसा . १६ - औसा तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून चोरी च्या घटना घडत आहेत. अशीच  घटना शहरातील कादरी नगर भागात काल घडली आहे. दिनांक 15 वार सोमवार दुपारी दोन च्या सुमारास शहरांमध्ये वॉशिंग पावडर विक्री च्या नावाखाली दोन  फ्रॉड व्यक्ती जागोजागी पावडर विकत होते. अनेक घरांचा मागोवा घेत असल्यामुळे त्यांना कोणत्या घरामध्ये कोण राहते याचा मागोवा बऱ्याच दिवसापासून घेत असल्याने पूर्व रचित डाव साधत घरातील पुरुष मंडळी नसल्याने एका महिलेला पावडर हवी आहे का ? असे विचारून घरात घुसले व त्यांनी संपूर्ण घर साफ केले यामध्ये त्यांनी जवळपास पाच तोळे सोने व इतर ऐवज लंपास केला. लुट केलेल्या या दोन व्यक्तींचा तपास पोलिस करत आहेत. शितल शिंदे यांच्या फिर्यादीवरून या दोन अज्ञात व्यक्ती विरोधात चोरीचा गुन्हा नोंद केला आहे. या बाबतीत सविस्तर माहिती अशी की राम शिंदे व्यापारानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी शीतल शिंदे व त्यांची दहा वर्षाची मुलगी घरात होती. दोन व्यक्तींनी पावडर विक्रीचा बहाना करत घरात घुसले व घरातील सोनं व इतर ऐवज लंपास केला. शहरात चोरी लुटमार होत असल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासनाने वेळीच जागे होऊन शहराला योग्य सक्षम अधिकारी देऊन जनतेच्या सुरक्षे साठी तत्पर रहावे अशी मागणी होत आहे.कारण आज 


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या