औसा तालुक्यातील मौजे तावशी व टाका या गावातील शेतकऱ्यांना महावितरणच्या धोरणाप्रमाणे शेतीपंपासाठी सुरळीत विजवठा करा

 औसा तालुक्यातील मौजे तावशी व टाका या गावातील शेतकऱ्यांना महावितरणच्या धोरणाप्रमाणे शेतीपंपासाठी सुरळीत विजवठा करा



औसा मुखतार मणियार

औसा तालुक्यातील मौजे तावशी व टाका या गावातील शेतकऱ्यांना महावितरणच्या धोरणाप्रमाणे शेतीपंपासाठी सुरळीत विजपुरवठा करा या मागणीसाठी ग्रामपंचायत  टाका येथील सरपंच लक्ष्मी बब्रुवान बंडगर व उपसरपंच व ग्रामसेवक यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी निलंगा  यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात अशी माहिती दिली आहे. महावितरणाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दररोज दहा तास वीजपुरवठा केला जातो. परतु काही दिवसापासून वरील दोन गावामध्ये शेतीपंपासाठी एक दिवसाआड वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची हक्काची वीज मिळत नाही. तरी तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करून दहा तास वीज देण्याची व्यवस्था करावी. हे जर तात्काळ नाही झाले तर दि 15 फेब्रुवारी 2021 सोमवार रोजी रोजी सकाळी 10 वाजता तावशी पाटी येथे असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रस्ता रोको करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाल्यास याची जबाबदारी आपली राहील. तरी तात्काळी वीजपुरवठा सुरळीत करून देण्यात यावा.या मागणीचे निवेदन दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या