औशामध्ये तहसीलदार कडून हिरवा झेंडा दाखवून महारेशिम अभियानास प्रारंभ

 औशामध्ये तहसीलदार कडून हिरवा झेंडा दाखवून महारेशिम अभियानास प्रारंभ

औसा

मुखतार मणियार





औसा-महारेशिम अभियान 2021 हे अभियान तहसिलदार शोभा पुजारी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरु करण्यात आले.

 दि. 10 फेब्रुवारी 2021 रोजी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करन्यात आली.सदर अभियान दि. 25 जाने,2021 ते  दि. 15 फेब्रुवारी 2021 या काळात शासनाने आदेशीत केलेल्या नियमाप्रमाणे चालणार आहे. सदर अभियानांतर्गत सामुहीक तुती लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात येते. सदर अभियानांतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति एकरी रू 500 भरुन जिल्हा रेशीम कार्यालय लातूर येथे नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या जमिनिमध्ये, कमी पाण्यामध्ये तसेच कमी खर्चामध्ये तुती लागवडद्वारे  रेशीम उत्पादन करून जास्तीत जास्त नफा मिळतो असे वैशिष्ट रेशीम शेतीचे आहे. पोखरा व मनरेगा सारख्या योजनाद्वारे सर्व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवण्याची संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. तरी सदर अभियानांतर्गत लाभ मिळवण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यात नोंदणी करण्याचे आवाहन मा.तहसीलदार यांच्याकडून करण्यात आले. यावेळी तहसीलदार शोभा पुजारी, नायब तहसीलदार श्री प्रदीप आळंदकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ज्योतिर्लीग चिखले,पंचायत समिती सदस्य तथा प्रगतशील रेशीम शेतकरी मुसके, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक विलास शिंदे,तांत्रिक सहाय्यक रोहित देशमुख, हिन्दुस्तान सिल्क इंडस्ट्रीज चे अभिनव भोसले, कृषि उत्पन्न बाजार समिती औसा चे संचालक निलेश आजणे, शरद कदम तसेच इतर कर्मचारी वर्ग व शेतकरी बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या