शिवजयंती निमित्ताने जिल्हा आरोग्य संकुल येथे वृक्षारोपण

 


शिवजयंती निमित्ताने जिल्हा आरोग्य संकुल येथे वृक्षारोपण





आज जिल्हा आरोग्य संकुल परीसर, जिल्हाधिकारी कार्याकय, बार्शी रोड याठिकाणी शिवजयंती निमित्ताने २५ मोठ्या झाडांचे रोपण करण्यात आले. पिंपळ, कडुनिंब, बकुळ, तबिकरोजीया या झाडांचे रोपण करून झाडांना भरपूर पाणी देण्यात आले.
यावेळी उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परीमंडळ डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख एल. एस., मुख्य प्रशासकीय अधिकारी, उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परीमंडळ, अनिल मस्के,राजेंद्र गीरी, पवन वाडकर,अभिजीत बाबर ईत्यादी आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.  कोरोनासोबत जगताना मानसिक स्वास्थ उत्तम राहणं आवश्यक असते आणि आपल्या आजूबाजूला असलेली हिरवळ, झाडे पाहीली की मानसिक स्वास्थ योग्य राहण्यास मदत होते असे मत डॉ. एकनाथ माले यांनी व्यक्त केले. ॲन्टी कोरोना गार्डन म्हणुन ही झाडे जगवली जातील असे ही आश्वासन डॉ. माले यांनी दिले.
हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी गंगाधर पवार, कल्पना फरकांडे, ॲड. वैशाली यादव-लोंढे, बाळासाहेब बावणे, बळीराम दगडे, रुषीकेश दरेकर,  शिवशंकर सुफलकर, सिताराम कंजे, महेश गेलडा, जफर शेख, सुलेखा कारेपुरकर, आशा अयाचित, श्रुती लोंढे,  सुरज पाटील, महेश भोकरे,  विजयकुमार कठारे, मोईझ मिर्झा, ॲड. सर्फराज पठान, कुंदन सरवदे, नागसेन कांबळे, प्रमोद वरपे, दयाराम सुडे, खाजाखॉ  पठान,  पठाण, बालाजी उमरदंड, अभिजीत चिल्लरगे, डॉ. अमृत पत्की, प्रसाद शिंदे, नितीन पांचाळ, अरविंद फड, तौसीफ सय्यद  इत्यादी सर्वांनी वृक्ष लागवडीकरीता खड्डे खोदणे, झाडे आणणे, काळी माती आणणे, झाडे लावणे, पाणी देणे याकरीता श्रमदान केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या