लातूर महानगरपालिकेमध्ये नियमबाह्य व बेकायदेशीरपणे दिलेला वैद्यकीय अधिकाऱ्याचा पदभार काढून घ्यावा.* लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांची आयुक्ताकडे मागणी.

 *लातूर महानगरपालिकेमध्ये नियमबाह्य व बेकायदेशीरपणे दिलेला वैद्यकीय अधिकाऱ्याचा पदभार काढून घ्यावा.* 

 लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांची आयुक्ताकडे मागणी.





लातुर : दि.२२ - लातूर महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय अधिकारी या पदावर शासनाने ठरवून दिलेले नियम धाब्यावर बसवून अत्यंत बेकायदेशीरपणे एमबीबीएस असलेल्या डॉक्टरला डावलुन एका बी ए एम एस असलेल्या डॉक्टरला लातूर महानगरपालिकेने वैद्यकीय अधिकारी म्हणून पदभार दिला आहे. महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी या पदावर नियुक्ती देण्यासाठी ते किमान एमबीबीएस असणे आवश्यक असताना बिएएमएस डॉक्टरांची नियुक्ती लातूर महानगरपालिकेने कोणत्या नियमाने केली ? असा प्रश्न लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त अमान मित्तल यांना केला आहे.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान चे अतिरिक्त अभियान संचालक मुंबई यांनी दि. २५/१०/२०१९ ला लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना स्पष्टपणे पत्र पाठवून बी ए एम एस शैक्षणिक अर्हता असलेल्या व्यक्तीस वैद्यकीय अधिकारी या पदावर नेमता येणार नाही असे कळवले आहे. अतिरिक्त अभियान संचालक यांनी कळवून सुद्धा डॉ. महेश पाटील यांची लातूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदावर बेकायदेशीर व नियमबाह्यपणे नेमणूक झालीच कशी ? आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचे आदेश धाब्यावर बसवणारे लातूर महानगरपालिकेचे प्रशासन ! दिसत असून *आंधळे दळत आणि कुत्र पिठ खातं* अशी अवस्था झाली असल्याचे मत व्यंकटराव पनाळे यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बी ए एम एस शैक्षणिक अर्हता असलेल्या व्यक्तीला वैद्यकीय अधिकारी या पदावर नेमण्यात येत नाही, असे स्पष्टपणे डॉ. सतीश पवार, अतिरिक्त अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी अभियान मुंबई, यांनी लातूर महानगरपालिकेला कळवलेले आहे. असे असताना डॉ. महेश पाटील यांना लातूर महानगरपालिकेत वैद्यकिय अधिकारी या पदावर नेमणूक करणारा महानगरपालिकेतला भ्रष्टाचारी अधिकारी कोण आहे ?महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल हे लातूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी या पदावर सध्या कार्यरत असलेले डॉ. महेश पाटील हे एमबीबीएस आहेत काय ? याची खात्री करून घेतील का ? बीएएमएस असलेल्या डॉ. महेश पाटील यांची महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी या पदावर नियमबाह्य व बेकायदेशीर पणे झालेली नेमणूक महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांनी तात्काळ रद्द करावी. व आपण कर्तव्यदक्ष असल्याची जाणीव लातूरकरांना करून द्यावी अशी मागणी आयुक्ताकडे व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे. लातूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील यांच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस हि वैद्यकीय पदवी नाही. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक असताना डॉ. महेश पाटील यांची लातूर महानगरपालिकेने महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी म्हणून कोणत्या कायद्याने नेमणूक केली ? लातूर महानगरपालिकेला एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी मिळत नाही काय ? मग महानगरपालिकेने बिएएमएस असलेले डॉ. महेश पाटील हे *वशिल्याचे तट्टू* कोणाच्या मेहरबानीने लातूर महानगरपालिकेत वैद्यकिय अधिकारी म्हणून आले ? 

लातूर महानगरपालिकेने केलेली वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक हा शहरवासीयात चर्चेचा विषय झाला आहे. लातूर महानगरपालिकेतले नगरसेवक मूग गिळून गप्प कसे ? याबद्दलही लोकात उलट-सुलट चर्चा चालू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या