माझ्या स्थानिक विकास निधीतून मतदारसंघातील ६१ गावांतील ४१४ किलोमीटर लांबीच्या १५३ वेगवेगळ्या शेत व पाणंद रस्त्यांचे ३३ ठिकाणांवरुन आज भूमिपूजन करण्यात आले!
औसा मुखतार मणियार
माझ्या मतदारसंघातील शेतरस्त्यांच्या सुधारणेच्या दिशेने आज १ आश्वासक पाऊल पडले. आज एकाच दिवशी औसा तालुक्यातील ६१ गावांतील ४१४ किलोमीटर लांबीच्या १५३ वेगवेगळ्या शेत व पाणंद रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्य कार्यक्रम उंबडगा खु. येथे संपन्न झाला तर इतर ३२ ठिकाणांवरुन विविध मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मातीकाम व दबई काम आमदार निधीतून तर खडीकरण व मजबुतीकरण काम मनरेगातून केलं जाणार आहे.
"चांगले शेतरस्ते नसणं ही शेतकऱ्यांची १ प्रमुख अडचण आहे. पेरणीवेळी शेतकरी बी बियाणे खांद्यावर/डोक्यावर घेऊन जातो पण हाती आलेलं उत्पन्न घरी आणायला अनंत अडचणी येतात, अनेक ठिकाणी मुबलक पाणी असूनही केवळ रस्ता नसल्याने चांगले उत्पन्न देऊ शकणारे पीक शेतकरी घेऊ शकत नाहीत. या सगळ्या विवंचनेतून मला शेतकऱ्यांना मुक्त करायचे आहे. आज सुरुवात झाली आहे, मतदारसंघातील शेवटच्या शेत/पाणंद रस्त्याचे काम होईपर्यंत थांबणे नाही" असे मनोगत यावेळी व्यक्त करुन मतदारसंघातील मातीकाम झालेल्या ३८२ रस्त्यांचे खडीकरण व मजबतीकरण मनरेगा अंतर्गत चांगले शेतरस्ते नसणं ही शेतकऱ्यांची १ प्रमुख अडचण आहे. पेरणीवेळी शेतकरी बी बियाणे खांद्यावर/डोक्यावर घेऊन जातो पण हाती आलेलं उत्पन्न घरी आणायला अनंत अडचणी येतात, अनेक ठिकाणी मुबलक पाणी असूनही केवळ रस्ता नसल्याने चांगले उत्पन्न देऊ शकणारे पीक शेतकरी घेऊ शकत नाहीत. या सगळ्या विवंचनेतून मला शेतक-यांना मुक्त करायचे आहे. आज सुरुवात झाली आहे, मतदारसंघातील शेवटच्या शेत/पाणंद रस्त्याचे काम होईपर्यंत थांबणे नाही" असे मनोगत यावेळी व्यक्त करुन मतदारसंघातील मातीकाम झालेल्या ३८२ रस्त्यांचे खडीकरण व मजबुतीकरण मनरेगा अंतर्गत पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती उपस्थित शेतकरी बांधवांना दिली.
"शेतकऱ्यांना चांगले शेतरस्ते तयार करून देण्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीने काम करेल, नकाशावरील रस्ते सामंजस्याने आणि गरज पडली तर कायदेशीर अधिकार वापरून मोकळे करून त्या रस्त्यांचे काम केले जाईल" अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी श्री पृथ्वीराज बी पी यांनी दिली.
या कार्यक्रमाला लातूरचे जिल्हाधिकारी श्री पृथ्वीराज बी पी, उपजिल्हाधिकारी श्री अरविंद लोखंडे, जि प मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिनव गोयल, औसा चे उपविभागीय अधिकारी श्री अविनाश कांबळे, नायब तहसीलदार श्री कानडे, गटविकास अधिकारी श्री सर्यकांत भजबळ औसा सार्वजनिक बांधकाम
: या कार्यक्रमाला लातूरचे जिल्हाधिकारी श्री पृथ्वीराज बी पी, उपजिल्हाधिकारी श्री अरविंद लोखंडे, जि प मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिनव गोयल, औसा चे उपविभागीय अधिकारी श्री अविनाश कांबळे, नायब तहसीलदार श्री कानडे, गटविकास अधिकारी श्री सूर्यकांत भुजबळ, औसा सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता श्री जयंत जाधव, भाजप औसा तालुकाध्यक्ष श्री सुभाष जाधव, श्री संतोष मुक्ता, सरपंच सौ छायाबाई कोळपे, उपसरपंच श्री शाहुराज कोळपे, माजी जि प सदस्य श्री प्रकाश पाटील, श्री प्रभाकर कोलपाक, श्री दत्तात्रेय कोळपे, सरपंच श्री विकास नरहरे, प्रा शिवरुद्र मुरगे, श्री सुधीर कोळपे, श्री मनोज थोरमोटे, श्री रंगनाथ खंदाडे, शेतकरी बांधव, अधिकारी, कर्मचारी व पत्रकार मित्र उपस्थित होते!
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.