विठ्ठल पांचाळ यांना रंगकर्मी प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
औसा प्रतिनिधी
रंगकर्मी साहित्य कला क्रिडा प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरिय पत्रकारिता पुरस्कार 2019-2020 चे वितरण शनिवार दि 20फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वा रघुकूल मंगल कार्यालय उदगीर येथील रंगकर्मी प्रतिष्ठान आयोजित उत्कृष्ट व शोध वार्ता गटातील पारितोषीक वितरण सामाजिक ,राजकीय, सांस्कृतीक व कला क्षेञातील अभिनेत्री शिवकांता सुतार, अभिनेता संकेत कोरलेकर मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृ. उ.बा. समितीचे सभापती सिद्धेश्वर मुन्ना पाटील उपस्थित होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, युवक कॉंग्रेस चे विधानसभा अध्यक्ष अमोल कांडगीरे, अभिनेता संकेत कोर्लेकर, अभिनेत्री शिवकांता सुतार, अभिनेता संकेत कोरलेकर चित्रपट महामंडळाचे सदस्य दत्ता जवळगे, शिवसेना तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, नेटपॅक चे फाऊंडर वैभव महाडिक, प्रवीण कुठार, मातृभूमी प्रतिष्ठान चे अध्यक्ष सतीश उस्तूरे, रत्नाकर कांबळे, पत्रकार विनोद उगीले, पांडुरंग बिरादार आदींची उपस्थिती होती
. त्यावेळी पत्रकार पांचाळ विठ्ठल यांच्या " विठ्ठला. .. कोणता पेरा घेऊ हाती" ..... अतिवृष्टी आणि कोरोणा मध्ये पिचलेल्या बळीराजाला कोण सावरेल ?आभाळ फाटले.....खरिपाची झाली दाणादाण.... या शेतकऱ्यांच्या बातमी मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदनांवर मांडल्या होत्या. कारण या वर्षी सर्वात जास्त अतिवृष्टी होवून हातातोंडाशी आलेली युग, उडीद, सोयाबीन,ऊस,पिवळा या पिकांचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आ मुळे सर्व नेस्त नाभुत झालेली पिके पाहून शेतकरी आपल्या देवाला आर्थ हाक मारत आहे की हे विठ्ठला मायबापा तू मी कोणता पेरा घेवू हाती आता हेच तू सांग अशी बळीराजाची वास्तव चित्र बातमी रूपाने मांडले होते.त्याच बातमी साठी त्यांना रंग कर्मी प्रतिष्ठान चे वतीने राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..... या पूर्वी त्यांना उदगीर पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा मराठवाडा स्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाला होता. सलग दोन पुरस्कार मिळवणारे ते तालुक्यातील पहिलेच पत्रकार आहेत. त्यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र सत्कार केला जात आहेत..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.