महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू - जयश्री घोडके

 महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू - जयश्री घोडके... 


भारतीय जनता पार्टी महीला मोर्चा तर्फे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न... 

औसा मुखतार मणियार





औसा - वाढत्या महागाईमुळे कुटुंबावर आर्थिक ताण पडत आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक गरजा भागवण्यासाठी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आघाडीच्या वतीने शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे प्रतिपादन भाजपा महिला आघाडीच्या नेत्या जयश्री घोडके यांनी केले आहे. याप्रसंगी 

 परिक्षित अभिमन्यू पवार यांची उपस्थिती होती. 

औशात भाजप महिला आघाडी मोर्चाच्या शहर अध्यक्षा जयश्री घोडके आयोजित रथसप्तमी निमित्त हळदी - कुंकू कार्यक्रमात बोलताना त्या बोलत होत्या. येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी प्रदेश सचिव कल्पना डांगे, 

सौ. स्वाती जाधव (पाटील) लातूर, सौ. गीता ठोंबरे(लातूर), शरयू कारंजे, पूनम मुक्ता, शांताबाई वागदरे, श्रुती कारंजे, अॅड. मोहिनी पाठक, नगरसेवक शांताबाई बनसोडे, शिल्पा कुलकर्णी, स्वप्नाली वाघमारे, स्वाती पवार, मंगल कांबळेे, मिनाबाई कांबळे यांच्यासह शहरातील असंख्य महिला उपस्थित होत्या. पुढे बोलताना जयश्री घोडके म्हणाले की, महिलांना आर्थिक बळकटी देण्यासाठी लघुउद्योग, बचत गटांना प्रशिक्षण व बँकांमार्फत अर्थसाह्य, महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती आदी उपक्रम हाती घेवून तळागाळातील महिलां पर्यंत शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या माध्यमातून सहकार्य करू असेही शेवटी सांगून महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे स्पष्ट केले. महिला आघाडीच्या शहराध्यक्षा जयश्री घोडके यांच्या प्रयत्नाने हळदी-कुंकू कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या