महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री ज़यंती साजरी


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी



लातूर-दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती 20 फेब्रुवारी  2021 पासून महाराष्ट्र सरकारच्या वतीने साजरी करण्याचे ठरल्याप्रमाणे  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा लातूरच्या वतीने आज साजरी करण्यात आली.
   या जयंती उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे औरंगाबाद विभागाचे उपाध्यक्ष दयानंद जडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील पत्रकार भवन येथे साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य पत्रकार संघाचे लातूर जिल्हा अध्यक्ष अशोक देडे व लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे हे उपस्थित होते.
     आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये दर्पण दिनच फक्त साजरा केला जात होता. परंतु आज राज्य शासनाच्या वतीने दर्पण दिनाचे निर्माते बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन 20 फेब्रुवारी 1812 हा आजपासून जयंतीदिन म्हणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सर्वांनी साजरा करावी,अशा आशयाचे निवेदन पत्रकार संघाला आल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये 20 फेब्रुवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असताना लातूर मध्ये ही साजरी करण्यात आली, असल्याची माहिती  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जिल्हा शाखा लातूरचे जिल्हा अध्यक्ष अशोक देडे दिली आहे.
     या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार मधुकर चलमले,प्रभाकर शिरुरे, काकासाहेब घुट्टे, धोंडीराम ढगे, महादेव डोंबे, सोमनाथ स्वामी, लहू शिंदे, आप्पासाहेब मूळजे, खंडेराव देडे,फोटोग्राफर राजू कवाळे,बालाजी वाघलगावे आदी उपस्थित होते. शेवटी शहराध्यक्ष महादेव डोंबे यांनी उपस्थित पत्रकार यांचे आभार व्यक्त केले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या