जमाल नगर उद्यानास कै.अड मुजीबोद्दीन पटेल व तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या इमारतीत कै. प.पु. मल्लिनाथ महाराज यांचे नाव द्यावे

 औसा येथील जमाल नगर उद्यानास कै.अॅड मुजीबोद्दीन  पटेल व तसेच औसा बसस्थानकात नूतन तयार करण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या इमारतीत कै. प.पु. मल्लिनाथ महाराज यांचे नाव द्यावे 19 फेब्रुवारी २०२१ रोजी मराठा भवनाचे भूमिपूजन करा: औसा शहर  काँग्रेस कमिटी ची मागणी







औसा मुखतार मणियार

औसा शहरातील जमाल नगर येथील उद्यानास कै. अँड मुजबोद्दीन पटेल व तसेच औसा बसस्थानकात नूतन तयार करण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला कै.प.पु. मल्लिनाथ महाराज यांचे नाव व 19 फेब्रुवारी२०२१ रोजी  मराठा भवनाचे भूमिपूजन करा व सांस्कृतिक सभागृहास देण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची अंमलबजावणी करावी. अशा मागणीचे निवेदन औसा काँग्रेस कमिटीच्या वतीने औसा नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख व मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या निवेदनात अशी माहिती मिळाली आहे की कै. अँड.मुजोबोद्दीन पटेल औसा शहराचे माजी नगराध्यक्ष होते, तसेच कै.प.पु. मल्लिनाथ महाराज हे औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार व औसा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष ही होते.वरील दोन्ही दिवंगत नेते हे तमाम औसेकरांसाठी अत्यंत आदरणीय श्रदिय राहीलेले आहेत. दोन्ही दिवंगत नेत्यांनी त्यांच्या कार्यकाळात ऐतिहासिक औसा शहरातील तथा तालुक्यातील सर्वच जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन कार्य केले आहे.व त्यांनी सतत जातीय सलोखा निर्माण करून तमाम महाराष्ट्रात एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.वरील दोन्ही दिवंगत नेत्यांच्या कार्यकाळात व शहरातील व तालुक्यातील सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहिले आहेत.वरील दोन्ही दिवंगत नेत्यांनी त्यांच्या कार्यकाळात औशाच्या विकासासाठी सतत प्रयत्न केले व शहराला विकासाच्या मार्गावर आणण्याचे काम त्यांच्या हातून सतत घडले आहे.कै. अॅड. मुजीबोद्दीन पटेल व कै.प. पु.मल्लीनाथ महाराज हे सध्या आपल्यात नाहीत.वरील दोन्ही दिवंगत नेते हे आम्हा तमाम औसेकरांसाठी प्रेरणादायी राहीलेले आहेत.तरी औसा शहरातील जमाल नगर  येथील उद्यानास कै.अॅड.मुजीबोद्दीन पटेल यांचे नाव तसेच औसा येथील बसस्थानकास तयार करण्यात आलेल्या नूतन शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या इमारतीस कै.प.पु.मल्लीनाथ महाराज यांचे नाव दयावे व १९ फेब्रुवारी २०२१ रोजी मराठा भवनाचे भूमिपूजन करावे व सांस्कृतिक सभागृहास देण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी आज दि.3 फेब्रुवारी 2021बुधवार रोजी औसा शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळीऔसा शहर कॉंग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष शकील शेख,अॅड. शाहनवाज पटेल, खुंदमीर मुल्ला,सय्यद अ.हमीद,गुलाब शेख, सय्यद अ.खादर,वहीद कुरेशी, श्याम एस भोसले, शेख शब्बीर,अल्हाज जहीरोद्दीन नांदुरगे,खैरात शेख, अॅड. समीयोद्दीन पटेल, अॅड.फैयाज पटेल, मुजम्मिल शेख अॅड राजु पटेल,आल्ताफ देशमुख, सुरेश सुर्यवंशी,आदि कॉंग्रेस कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या