महावितरणच्या निषेधार्थ आम्ही लातूरकराचे वीज बंद आंदोलन !
लातूर ः महावितरण लातूरच्या आडमूठ्या धोरणाचा निषेध म्हणून आणी अंदाजीत विज बलाची वसूली थांबवावी, कोरोना कोविड कालावधीतील वीज बिल माफ करावे अशी मागणी आम्ही लातूरकरांच्यावतीने केली असून दि. 05 फेब्रूवारी 2021 रेाजी साय. 7 ते 7.30 पर्यत लातूर जिल्ह्यातील व शहरातील तमाम घरातील वीज बंद करुन 30 मिनिटे वीज बंद आंदोलन करणार असल्याने, आम जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दि. 02 फेब्रुवारी रोजी पत्रकार भवन लातूर येथे बैठक घेण्यात आली होती, ं बैठकीत आम्ही लातूरकर मोठ्या संख्येने सामील झाले होते, महावितरण कंपणीच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्याचे ठरले होते,
मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांना लातूर जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार कोरोना कोविड काळातील वीज बील माफ करावे, अंदाजीत थकीत बिलावर महावितरणने व्याज लावू नये, कोरोना कोविड नंतरचे वीज बील आकारणी करावी अशा मागणी आम्ही लातूरकरानी केली असून महावितरण लातूरच्या आडमूठ्या धोरणातून वीज बील वसूल करणे, जबरदस्तीने वीज जोडणी तोडणे अशा कारवाईचा निषेध म्हणून आम्ही लातूरकरांच्यावतीने शहरातील 30 मिनिटे वीज बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला असून निवेदनावर भाई उदय गवारे, अॅड. भालचंद्र कवठेकर, लाला सुरवसे, अॅड. आर.के. चव्हाण, सतीष देशमूख, अॅड. उगले व्ही.व्ही., अॅड. व्ही.एम. करडे, अॅड. पि.डी. देडे, अॅड. शिवकुमार बनसोडे, अॅड. प्रशात गायकवाड, बनसोडे बाबासाहेब बाळू, रुपेश गायकवाड, सिध्दार्थ सुर्यवंशी, अजय सुर्यवंशी, विकास दंडे, विनय जागते, मोहन गोरे, विकास दंडे सर, शाम माने, यांच्या सह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत.
जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यासाठी दोन ते तिन नागरीकांना परवागनी असल्याने कार्यकर्त्यानी जास्त गर्दी केली नाही.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.