शासकीय सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते युवराज सिद्रामप्पा कलशेट्टी यांचा सत्कार
लातूर (प्रतिनिधी) : शासकीय सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन, लातूर येथील निदेशक अभिरक्षक युवराज सिद्रामप्पा कलशेट्टी यांचा सत्कार मंत्री उदय सामंत (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य,) यांच्या हस्ते संचालक, डॉ. अभयजी वाघ, (तंत्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,) डॉ. महेश शिवणकर, (सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, औरंगाबाद,) डॉ. कमलाकर बकवाड (प्राचार्य, पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन, लातूर,) यांच्या उपस्थितीत शनिवार (दि.13 फेब्रुवारी) रोजी सत्कार करण्यात आला.
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात सरकार आपल्या दारी या कार्यक्रमात शासकीय सेवेत उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल युवराज सिद्रामप्पा कलशेट्टी यांना प्रशस्ती पत्र व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या प्रशंसा पत्रात म्हटले आहे की, युवराज कलशेटृी यांनी सन 2003 - 2012 या कालावधीत सर्व शिक्षण अभियानांतर्गत मराठवाडयातील तीन जिल्हयात काम केले. तसेच थर्ड पार्टी ऑडीट मधुन शासनास अंदाजे 2 कोटींचा महसूल देण्यामध्ये महत्वाचा सहभाग नोंदविला आहे. मा. जिल्हाधिकारी कार्याल, लातूर येथे निवडणुक कालावधीत अत्युत्कृष्ट काम केल्याबद्दल मा. जिल्हाधिकारी, लातूर यांच्या हस्ते विशेष प्रमाणपत्र मिळाले आहे. कलशेट्टी यांच्या या कार्याचा तंत्रशिक्षण विभागाला अभिमान आहे. असा गौरवपुर्ण उल्लेख प्रशंसा पत्रात करण्यात आला आहे.
कलशेटृी यांच्या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार ही करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुरेश कर्पे, सचिव श्री निलेश भोसले, प्रा. राजेश खरात, उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.