जागेवर अतिक्रमण केल्यामुळे आत्महत्याग्रस्त कुटुंब उघड्यावर....
औसा प्रतिनिधी /-
इलयास चौधरी
आपल्या जागेवर अतिक्रमण करून धमक्या दिल्याने एकाने आत्महत्या केली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पतीच्या आत्महत्येनंतर सात मुलाच्या आईला त्रास दिला जात असल्याने आत्महत्याग्रस्त पतीची पत्नी न्याय मिळण्यासाठी त्रस्त झाली असून कुटुंब उघड्यावर आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, रुकसाना वसीम शेख रा. लातूर हा. मु. खडकपुरा औसा यांचे पती वसीम शेख (वय 38 वर्षे) यांनी आपल्या जमिनीवर अतिक्रमण करणारे त्रास देत असल्याची चिठ्ठी लिहून दि. 15 जानेवारी 2019 रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे सात मुलांचे वडिलांचे छत्र हरवल्याने आपल्या सात मुलांना घेऊन रुकसाना वसीम शेख या माहेरी राहत आहेत. त्यांच्या सासर कडील मौ. कान्हेरी ता. जि. लातूर येथील सर्वे नंबर 14 / अ मधील 11. 42 गुंठे जमिनीवर चुलत सासरे अनिस अब्दुल शेख, खाजाबानू अन्सारी, रमाकांत स्वामी रा. लातूर यांनी संगनमताने अतिक्रमण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने आत्महत्याग्रस्ताची पत्नी सध्या वडीलाकडे औसा येथे राहत आहेत. गरिबी परिस्थितीनेत्रस्त असलेल्या रुकसाना वसीम शेख आपल्या पतीच्या आत्महत्येनंतर न्याय मिळावा म्हणून धडपडत आहेत. जिल्हाधिकारी लातूर, जिल्हा पोलीस अधीक्षक लातूर यांच्याकडे त्यांनी धाव घेतली आहे. उपरोक्त धमकी देणार्यांनी रुकसाना वसीम शेख यांच्या जागेत अतिक्रमण करून डबे मारले आहेत. सदर जागेवर गेल्यानंतर अनिस अब्दुल शेख, खाजाबानू अन्सारी, आणि रमाकांत स्वामी हे कांही महिला व पुरुषांना पाठवून मारहाण करीत असल्याने आत्महत्याग्रस्ताची पत्नी भेदरली आहे. पतीच्या निधनानंतर सदर लोकांकडून मानसिक त्रास होत असून मला त्रास देणाऱ्या पासून संरक्षण मिळावे व माझ्या जागेतील अतिक्रमणे काढून मला न्याय द्यावा अशी मागणी रुकसाना वसीम शेख यांनी केली आहे. मला न्याय नाही मिळाल्यास सातही लेकरांसह आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही अशी प्रतिक्रिया रुकसाना वसीम शेख यांनी दिली आहे...
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.