वारकरी सेवा फौंडेशनच्या औसा तालुका कार्यकारिणी साठी तपसे चिंचोली येथे आढावा बैठक पार

 *वारकरी सेवा फौंडेशनच्या औसा तालुका कार्यकारिणी साठी तपसे चिंचोली येथे आढावा बैठक पार*






औसा  प्रतिनिधी:-

महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, गायक व वारकरी साधकांनी एकत्रित येऊन समाजसेवेसाठी पुढाकार घेऊन वारकरी सेवा फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी व लोकहिताची कामे केली जात आहेत.


वारकरी सेवा फौंडेशनच्या वतीने नुकतेच रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली. तसेच वारकरी निधी अर्बन लि. या बँकेची स्थापना करण्यात आली आहे तसेच येणाऱ्या काळात माफक दरात सेवा देणाऱ्या दवाखाना उभारणीचा संकल्प फौंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे.


अध्यात्मिक ,सामजिक सांस्कृतिक वारसा  जपण्याकरिता तळागाळातील नामवंत गायक,कीर्तनकार ,वादक मंडळी एकत्रित  येत आहेत. चांगल्या विचारांची संस्कृतीची  जपणूक आणि  आदर्श संस्काराचा तरुण वर्ग घडवण्यासाठी वारकरी सेवा फौंडेशनचे कार्य  संपूर्ण महाराष्ट्राभर सुरू आहे.


वारकरी सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेचा शाखा विस्तार करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील तपसे चिंचोली(ता.औसा)  येथील दत्ताश्रमात आढावा बैठक दि:- १४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली.


यावेळी वारकरी सेवा फाऊंडेशनची भविष्यातील ध्येय धोरणे आणि  कार्य करण्याची  माहिती फौंडेशनचे खजिनदार दत्ता महाराज यादव यांनी दिली.


या बैठकीसाठी

 वारकरी सेवा फौंडेशनचे खजिनदार दत्ता महाराज यादव,जगदीश पाटील,अतुल कोरेकर, प्रशांत नेटके(तपसे चिंचोली) ,राजेंद्र कांबळे(आशिव),धनंजय मुकडे(उजनी),वैजनाथ पाटील ,नवनाथ कोहाळे,सरोजिनी दीदी (औसा ),शुभांगी जाधव आदी सर्वजण 

उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या