घरकुलाचे बिल काढण्यासाठी २ हजाराची लाच घेताना ग्रामसेवकास रंगेहाथ पकडले

 घरकुलाचे बिल काढण्यासाठी २ हजाराची लाच घेताना ग्रामसेवकास रंगेहाथ पकडले.




 औसा मुखतार मणियार

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील ग्रामपंचायत अंबुलगा ( बु)  येथील पंतप्रधान अावास योजनेच्या घरकुलचे बिल काढण्यासाठी २ हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने धाड टाकत ग्रामसेवकास रंगेहाथ पकडले. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील अंबुलगा (बु) येथील ग्रामसेवक वैजनाथ चाञे यांनी राम वामन बिरादार यांच्याकडून पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचे बिल आदा करण्यासाठी २ हजाराची लाच मागितली व ती देताना लातूर येथील लाचलुचपत विभागाने गावच्या ग्रामपंचायत मध्ये रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. यामुळे निलंगा पंचायत समिती कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. सदरील प्रकरणात औराद शा.पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक सुधीर सुर्यवंशी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या