ग्रीन व्हॅलेंटाईन डे....वृक्षमित्र दिवस झाडे लावून साजरा केला 'ग्रीन व्हॅलेंटाईन डे' ग्रीन लातूर वृक्ष टीमचा उपक्रम

 



ग्रीन व्हॅलेंटाईन डे....वृक्षमित्र दिवस
झाडे लावून साजरा केला 'ग्रीन व्हॅलेंटाईन डे'
ग्रीन लातूर वृक्ष टीमचा उपक्रम.
'व्हॅलेंटाईन डे'  व ह्र्दय याचे संबंध सर्वश्रुत आहे. शहराचे ह्रदय म्हणजे झाडे, आणि शहरात झाडे नसतील तर शहराचे आरोग्य बिघडणारच. म्हणुन कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यावेळेसचा 'व्हॅलेंटाईन डे' 'ग्रीन 'व्हॅलेंटाईन डे' म्हणुन साजरा करण्याचे ग्रीन लातूर वृक्ष टीमने ठरवले.  
“झाडे लावणे व झाडे जगवून पर्यावरण संरक्षण करणे ही काळाची गरज आहे ” हे ओळखून लातूरच्या ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी व्हॅलेंटाईन डे निमित्ताने बाभळगाव रोडवरील शिक्षक कॉलनी येथे ३२ मोठी झाडे लावली. झाडांना टॅकरद्वारे पाणी दिले. झाडांना फुगे बांधून झाडांवर प्रेम करावे, झाडांसोबत जगावे, निसर्गाचे आरोग्य जपा, झाडांना पाणि द्या, शहराचे आरोग्य जपा असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.
वाढत्या प्रदुषणामुळे, घातक रसायनांचा दैनंदिन जीवनात वाढत चाललेला वापर यामुळे  रोगप्रतिकारक शक्ती कमी होउन माणसांचे आरोग्य बिघडत चालले असल्याचे कोरोनाच्या रुपाने समोर आले आहे. निसर्गाचे आरोग्य टिकविणे, मानवाचे आरोग्य टिकविणे याकरीता पर्यावरण रक्षण करणे महत्वाचे आहे. आणि झाडांची संख्या वाढल्याशिवाय पर्यावरण सुधार होणार नाही याकरीता ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी या 'व्हॅलेंटाईन डे'  पासून पुढील 'व्हॅलेंटाईन डे' पर्यंत दररोज १० झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.
हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, ॲड. वैशाली यादव-लोंढे, बालाजी शिंदे, लक्ष्मण केंद्रे, कल्पना फरकांडे, रुषीकेश दरेकर,  शिवशंकर सुफलकर, सिताराम कंजे, सुलेखा कारेपुरकर, आशा अयचित, श्रुती लोंढे, सिया लड्डा, गोविंद शिंदे,  सुहास पाटील,  सुरज पाटील, महेश भोकरे,  कृष्णा वंजारे, विजयकुमार कठारे, मुकेश लाटे, मोईझ मिर्झा, ॲड. सर्फराज पठान, कुंदन सरवदे, नागसेन कांबळे, प्रमोद वरपे, दयाराम सुडे, ख्वाजाखां पठाण, बालाजी उमरदंड, मंगेश शिंदे, विक्रांत भुमकर, आदित्य लोंढे, अभिजीत चिल्लरगे, शिक्षक कॉलनीचे राजाभाउ गवळी, कल्याणकर, सिरसाट, घटकर, मोहन कठारे, चामले,ज्योतीबा माने, देशमुख सर इत्यादी सर्वांनी वृक्ष लागवडीकरीता खड्डे खोदणे, झाडे आणणे, काळी माती आणणे, झाडे लावणे, पाणी देणे याकरीता श्रमदान केले.
यावेळी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना  ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने व शिक्षक कॉलनीच्या नागरीकांच्या वतीने श्रध्दांजली  अर्पण करण्यात आली.*
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या