खाजगी कोचिंग क्लासेस / प्रशिक्षण संस्थांनी कोविड सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करावे -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 खाजगी कोचिंग क्लासेस / प्रशिक्षण संस्थांनी

कोविड सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करावे

                                   -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.




  लातूर,दि.17,(जिमाका) जिल्हयातील खाजगी कोचिंग क्लासेस / प्रशिक्षण संस्था येथे कोविड सुरक्षा नियमांचे (मास्कचा वापर, शारीरीक अंतर, सॅनिटायझर व स्वच्छता ई.) सक्तीने पालन करण्याचे आदेश देत आहे. सदर नियमांचे तंतोतंत पालन होत असल्याचे महानगरपालिका /नगर परिषद, पोलीस प्रशासना मार्फत पथक नियुक्त करुन उक्त नियमांची तपासणी करण्यासाठी वेळोवेळी अचानक भेटी देवून तपासणी करावी व नियमांचे पालन होत नसल्यास दंडात्मक कार्यवाही करावी व पुन्हा नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास सदर क्लास चालकाविरुध्द गुन्हे दाखल करुन क्लासेस सिल करण्यात यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005, साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार तसेच महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम, 2020 ई. मधील तरतुदीनसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, व आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी,असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी  आदेशित केले आहे.

शासन पत्रकान्वये शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही  तयार करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आली आहे. त्याअन्वये जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून मला घोषित करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांत कोविड-19 रुगणांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेले बहुतांश निर्बध हटविण्यात आले असून विविध सामाजिक ,धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतीक व राजनितीक व इतर कार्यक्रमात मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याच बरोबर वातावरण बदलामुळे नागरिकांमध्ये सर्दी, खोकला,ताप,अंगदुखी ई. कोविड सदृश्य लक्षणे दिसून येत आहेत. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखणेसाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक असून त्याचाच एक भाग म्हणून कोविड सुरक्षा नियमांचे सक्तीने पालन करण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सांगितले.

खाजगी कोचींग क्लासेस तपाणी :-

1.सुर्यवंशी क्लासेस, 2.कौशल्य ॲकॅडमी, 3. दिक्षा क्लासेस, 4. आय.आय.बी. क्लासेस ऑफ बॉयलॉजी, 5. स्टेप बाय स्टेप क्लासेस, 6. फोर्स ॲकॅडमी क्लासेस, 7. विद्यालंकर क्लासेस, 8. मोटेगाव क्लासेस,9. रेणूकाई क्लासेस, 10. आरडीस केमीस्टी क्लासेस, 11. नायडू क्लासेस व 12. जोशी क्लासेस मॅथ.

उपरोक्त 12 खाजगी क्लासेसची तपासणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांच्या पथकाने आज केली. व त्

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या