अयोग्य व चुकीच्या पध्दतीने जाहिरात करून महिलांची मानहानी करणाऱ्या लक्स कोझी कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची पोलीस अधीक्षक लातुर यांना मागणी
------------------------------
निवेदनाद्वारे लातुर शहर हे विविध क्षेत्रात नामांकित असून शहरात व्यापार वृद्धीसाठी अयोग्य व चुकीच्या पद्धतीने सार्वजनिक वाहतुक व्यवस्था जसे ऑटो रिक्षा व इतर वाहनांच्या माध्यमातून लक्स कोझी व इतर कंपन्या महिलांच्या अंतर्वस्त्राच्या जाहिराती करीत आहेत अश्या अश्लील जाहीरातीतुन महिलांच्या देहाचे प्रदर्शन करून उद्योग व व्यवसाय वाढीचे तंत्र वाढले आहे यामुळे स्त्रियांची समाजातील प्रतिमा मलीन होऊन, मानहानी होते आहे
समाजात दिवसेंदिवस होत असलेले स्त्रियांवरील अत्याचार व मुलींचे छेडछाडीचे प्रकार लक्षात घेता भारतीय दंड संहितेच्या २९२,२९३,२९४ व स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंधक कायदा व नियम अंतर्गत गुन्हे दाखल करावेत तसेच सार्वजनिक वाहतुक करणारे ऑटो रिक्षा आदी वाहनचालक व मालकांना चुकीच्या जाहिराती न करण्याबाबत योग्य ती समज देण्याची मागणी करण्यात आली आहे
शिष्टमंडळात सक्षम महिला, सदृढ बालक एक जनआंदोलन च्या कार्यवाहक अँड छाया मलवाडे, अँड प्रदीपसिंह गंगणे, ताहेरभाई सौदागर, प्रा भीमराव दूनगावे,अँड सुनीत खंडागळे, अँड शिवकुमार क्षीरसागर, अँड अश्विन जाधव, मनोज पांचगे,फिरोज तांबोळी आदी उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.