पत्रकार संघाच्या 16 व्या राज्यस्तरीय अधिवेशनास लातूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पत्रकार जाणार - अशोक देडे
लातूर- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आयोजित ठाणे येथील 16 व्या राज्यस्तरीय अधिवेशनास लातूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पत्रकार बांधव जाणार असल्याची माहिती लातूर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांनी दिली.
ठाणे येथे दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मा. मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या उपस्थिती मध्ये तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे व मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभवजी स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या 16 व्या अधिवेशनाच्या पूर्व तयारीसाठी लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे मराठवाडा विभागाचे उपाध्यक्ष दयानंद जडे यांच्या अध्यक्षखाली बैठक संपन्न झाली. यावेळी मराठवाडा विभागाचे सचिव दीपरत्न निलंगेकर व जिल्हाध्यक्ष अशोक देडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय सचिव दीपरत्न निलंगेकर व जिल्हा संघटक सुधाकर फुले, दयानंद जडे यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ पत्रकार मधुकर चलमले,प्रभाकर शिरुरे, लिंबराज पन्हाळकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हारुण मोमीन आदीसह सर्व तालुक्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार शहराध्यक्ष महादेव डोंबे यांनी मानले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.