औशात आ.अभिमन्यू पवार यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन..
औसा - आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते औसा शहरातील छत्रपती संभाजी महाराज नगर येथील हनुमान मंदिर सभागृह, नाथ नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर बैठक व्यवस्था व ब्राह्मण गल्ली येथील दास साळुंके ते हनुमान मंदिर सिमेंट रस्ता आदी विकासकामांचे भूमिपूजन दि.७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
संभाजी नगर येथील नागरिकांची १९९५ पासून सभागृहाची मागणी होती यावर निवडणुकीत याठिकाणी हे कामे पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन संतोषअप्पा मुक्ता यांनी नागरिकांना दिले होते.यानुसार आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन या कामाला निधी उपलब्ध करून घेत या कामाचे भूमिपूजन केले.बऱ्याच वर्षापासून विकास कामापासून दुर्लक्षित असलेल्या या भागातील विकास कामांना अखेर सुरुवात झाली असून यासाठी संतोष मुक्ता,नितीन शिंदे व संभाजी नगर मित्रमंडळींना सातत्याने प्रयत्न केले होते.या कार्यक्रमासाठी राजेंद्रगिरी महाराज,भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव,सुशीलदादा बाजपाई, अरविंद कुलकर्णी, संतोषअप्पा मुक्ता, प्रा. भिमाशंकर राचट्टे, संदिपान जाधव, प्रदीप मोरे, भरत सुर्यवंशी, सुरेश भुरे,नितिन शिंदे,नगरसेवक गोपाळ धानूरे, समीर डेंग, संतोष चिकुर्डेकर, भिमाशंकर मिटकरी,अजित मुसांडे, जगदिश परदेशी, धनराज परसणे, पप्पूभाई शेख, शिवरुद्र मुर्गे, गजानन शेटे, श्रीरंग मोरे, बाबा जाधव, आकाश जाधव,सतिश पवार, विनोद शिंदे ,महादेव मोरे , गुणाजी पवार, विष्णू खुरपे,शैलेश पाटील, सुमित शिंदे, रवी भडके, जोतिराम गायकवाड, गणेश कळसे, संतोष बाजपाई, किरण भडके, बालाजी शिंदे, महेश शिंदे, गणेश नलगे, महादेव मोरे, अमर जाधव, दादा मोरे, महेश भडके,विलास शिंदे, जोतिराम जमादार, काशीराम शिंदे, आदीसह नागरिक उपस्थित होते...
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.