उजनी येथे शेतकर्याचे साखळी आंदोलन सुरू
4 थ्या दिवशीचे उपोषणकर्ते
गुळखेडा व चिंचोली काजळे
औसा प्रतिनिधी
खरीप २०२० अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान झालेल्या व विमा कंपनीला विमा हफ्ता भरलेल्या ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीने जागृती न केल्यामुळे ऑनलाइन अर्ज किंवा कंपनीने कृषी आयुक्त कार्यालय यांच्या जीआर चे पालन न केल्यामुळे ऑफलाइन अर्ज दाखल करू शकले नाहीत,त्यांना कृषी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी काढलेल्या जीआर प्रमाणे सरकारने केलेले पंचनामे ग्राह्य धरून कंपनीने नुकसान भरपाई द्यावी
विमा कंपनीने शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसानीची तक्रार ऑनलाईन अप वर दाखल करण्यास सांगितली होती, परंतु त्याची वेळेत जनजागृती न झाल्यामुळे तसेच शेतकऱ्यांना शेताकडे जाणारा रस्ता पावसामुळे बंद झाल्यामुळे तसेच मोबाईल नेटवर्क बंद पडल्यामुळे ऑनलाइन तक्रार दाखल करणे शक्य नसल्यामुळे त्यांनी ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या नाहीत.
त्यानंतर कृषी आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य यांनी जीआर द्वारे असे घोषित केले की, जे शेतकरी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास अपयशी ठरले आहेत त्यांनी जरी ऑफलाईन अर्ज दाखल केले तरी कंपनीने ते अर्ज दाखल करून घ्यावेत.तसेच सोबत कृषी आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य यांनी काढलेला जीआरबाबतची माहिती शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर शेतकरी जेव्हा ऑफलाइन अर्ज दाखल करावयला गेले, तेव्हा कंपनीने अर्ज स्वीकारले नाहीत.
कृषी अधीक्षक कार्यालय लातूर यांच्या द्वारे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार असे दिसून येते की, पूर्ण लातूर जिल्ह्यातील तसेच औसा तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचा ऑफलाईन अर्ज कंपनी कडून स्वीकारला गेला नाही.
तरी या कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे तसेच कंपनीने कृषी आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य यांनी काढलेला जीआरचे पालन न केल्यामुळे जे शेतकरी काढणीपश्चात ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात अपयशी ठरले त्यांना कृषी आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य यांनी काढलेल्या जीआर प्रमाणे सरकारने केलेले पंचनामे ग्राह्य धरून कंपनीने नुकसानभरपाई द्यावी.
या साठी उजनी येथे शेतकरी व त्यांच्या पोराचे उपोषण य 5 फेब्रुवारी पासून सुरू आहे या आंदोलनात वांगजी .चिंचोली. वडजी.अशीव. अशा अनेक गावांनी यात सहभाग नोंदवला आहे यात अजिंक्य शिंदे यांच्या नेत्रतवाखाली हे उपोषण करण्यात येत आहे आज उपोषणाचा 4 था दिवस असून गुळखेडा व काजळे चिंचोली येथील तरुण सहभागी झाले त्यामध्ये सुरेश भोसले, गोपाळ शिंदे, ज्ञानोबा गायकवाड, बालाजी गिराम, समदानी शेख, परमेश्वर शिंदे, शिवाजी चेंडके, बालाजी सुरवसे, महावीर भोसले, नरेंद्र गोरे, भास्कर भोसले, सुभाष शिरसले, नानासाहेब भोसले, महामूद पटेल, बापू आप्पा साखरे, साबुन शेख, चांद पटेल, नागोराव पवार, सतीश गोरे, प्रफुल मुगावे, सुधाकर शिंदे, सुनील शेलार, विकास लांडगे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.