धानोरा सरपंचपदी सुर्यकांत (सुरेश) मुसळे उपसरपंच शंकर (नागेश) कोळपे....
औसा प्रतिनिधी/- औसा तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायतीच्या सरपंच /उपसरपंच पदासाठी निवडणूक अधिकारी श्री दहिरे यांच्या उपस्थितीत दि. 8 फेब्रुवारी निवडणूक घेण्यात आली.
शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत सर्व जागा जिंकून जिल्हा प्रमुखांनी ग्रामपंचायतीवर सलग चौथ्यांदा वर्चस्व स्थापन केले.शिवसेना जिल्हाप्रमुखाचे गाव असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्व तालुक्यातील जनतेचे लक्ष होते
यात सरपंच पदी सूर्यकांत(सुरेश) दगडू मुसळे तर उपसरपंचपदी शंकर (नागेश) तुकाराम कोळपे यांचा एकमेव अर्ज आल्याने अध्यासी अधिकारी दहिरे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले या निवडीस ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम अभंगराव कोळपे, सौ पूजा सुदर्शन सोमवंशी (कास्ते) , सौ. लता कल्पेश हाळे, सौ. सुकमार लक्ष्मण जवादे, सौ. सवित्री बालाजी जन्मले उपस्थित होते
नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचे स्वागत सर्वश्री शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, बेलपान कास्ते, अजित सोमवंशी, मनोज कुलकर्णी, संजय सोमवंशी, रमेश सोमवंशी, आत्माराम कोळपे, जीवन पाटील, रंजीत कोळपे, अरविंद कोळपे, विक्रम पाटील, सय्यद बागड, राजा साहेब सय्यद, बालाजी जलमले, बालाजी शिंदे, पापास कोळपे, सुग्रीव हाळे, महादेव जवादे, व्यंकट कास्ते, योगेश कोळपे, बब्रुवान पाटील, विलास पाटील, निळकंठ पाटील, विनायक क्षेत्रपाळे, दीपक कोळपे, सतिष कोळपे, मिलिंद हाळे, बाबुराव दुधभाते, आत्माराम जवादे, नामदेव हाळे, सिराज सय्यद, बबन सय्यद, बाबासाहेब सोमवंशी, संभाजी कोळपे, राजेंद्र कोळपे, शेषेराव कास्ते आदींनी अभिनंदन करून गावविकास कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.