नॅशनल उर्दू हायस्कूल परभणी येथे
*मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा*
*परभणी* २७ फेब्रुवारी
शहरातील नॅशनल कॅम्पस स्थित नॅशनल उर्दू हायस्कूल येथे ज्येष्ठ कवी *विष्णू वामन शिरवाडकर* उर्फ *कुसुमाग्रज* यांचा जन्मदिवस अर्थात *मराठी भाषा गौरव दिन* उत्साहात साजरा करण्यात आला.
covid-19 विषाणूच्या अनुषंगाने दहावी व बारावीचे वर्ग वगळता पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या आहेत. म्हणून शाळेतील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने आपापल्या पाठ्य पुस्तकातील मराठी कविता तालासुरात साभिनय सादर केली. व तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांनी शारीरिक अंतर ठेवून शाळेत निबंध लेखन स्पर्धेत उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका आयेशा कौसर खान यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या जीवनावर सविस्तर प्रकाश टाकला तर मराठी विषय शिक्षक इक़्बाल सरांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद केले.
यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.