*आझाद महाविद्यालयात शिवजयंती साजरी*
औसा _येथील आझाद महविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी इतिहासाचे प्रा डॉ. शहाजहान शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापन करण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती सर्वांना सांगितली. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. ई. यु मासूमदार यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम संघटक होते. ते गोरगरिबांचे कैवारी होते, त्यांचे कार्य पाहून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा आपणास मिळते असे ते म्हणाले.या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य टी. ए. जहागीरदार , रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. संजय चव्हाण, प्रा. व्ही. जी. जावळे, तसेच प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.