लातूर महानगरपालिकेला ODF++ मानांकन
देशातील मोजक्या शहरात लातूरचा समावेश
देशातील मोजक्या शहरात लातूरचा समावेश
लातूर/प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिकेला ODF ++ मानांकन प्राप्त झाले असून यामुळे देशातील काही मोजक्या शहरांमध्ये लातूरचा समावेश होणार आहे.महानगरपालिका पदाधिकारी,अधिकारी शहर स्वच्छतेसाठी घेत आसलेल्या परिश्रमांना यामुळे यश आले .या कामगिरीबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे,उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
गेल्या काही दिवसात लातूर शहराला स्वच्छ,सुंदर व हरित करण्यासाठी महापालिका मेहनत घेत आहे.यासाठी पालिकेने विविध उपक्रमही राबवले आहेत.शहरातील प्रत्येक घरात शौचालय असावे, महानगरपालिकेचा मानवी मैल्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प असावा या अटींची पूर्तता हे मानांकन प्राप्त करण्यासाठी करणे गरजेचे असते.लातूर महापालिकेने सर्व निकष पूर्ण केल्यानंतर हे मानांकन शहराची तपासणी करून देण्यात आले आहे.मैल्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प हा यासाठी मैलाचा दगड असून गतवर्षी हा प्रकल्प नसल्यामुळेच लातुरचे मानांकन हुकले होते.
लातूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकूण ६६ हजार वैयक्तिक शौचालये आहेत. शहरातील प्रत्येक घरात शौचालय असून १२ सार्वजनिक शौचालये आहेत.एमआयडीसी मध्ये असणाऱ्या मानवी मैल्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील स्वच्छ केलेल्या सेफ्टीटँक मधील मैल्यावर प्रक्रिया केली जाते .त्यातून निघणारा घनपदार्थ शेतकऱ्यांना खत म्हणून दिला जातो.
ODF ++ चे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या पथकाने शहरातील सार्वजनिक शौचालयांची पाहणी केली.एकूण शौचालयांपैकी २५ टक्के शौचालये उत्कष्ट असण्याची अट Odf ++होणेसाठी बंधनकारक आहे.
लातुरातील सर्वच शौचालये उत्कृष्ट असल्याचा शेरा तपासनी पथकाने नोंदवला. ही लातूर शहरासाठी अभिमानास्पद व कौतुकास्पद बाब आहे या सर्वेक्षणानंतर लातूरला ODF++ हे मानांकन प्राप्त झाले आहे.
तत्कालीन पालिका आयुक्त देविदास टेकाळे,विद्यमान आयुक्त अमन मित्तल , सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे,शहर समन्वयक आरती मिसार, आस्थापना प्रमुख रमाकांत पिडगे,पर्यावरण सल्लागार राहुल बोबे,एसटीपी प्लॅंटचे प्रमुख रवी कांबळे,सत्यजित मुंडे,योगेश चव्हाण यांच्यासह प्रत्येक प्रभागातील स्वच्छता निरीक्षकांच्या उत्तम नियोजन व योगदानामुळे लातूरला हे मानांकन प्राप्त झाले आहे.
महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.लातूर शहर स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत अग्रेसर रहावे,लातूरचा त्यात पहिला क्रमांक यावा यासाठी महापालिकेच्या बरोबरीने शहरातील प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करावेत,असे आवाहन
केले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.