नरेगाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या 17 लक्ष रू.च्या पाणीपुरवठा टाकी ते कोंड- शिव या शेत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
औसा मुख्तार मणियार
आज दि.18 मार्च 2021 गुरुवार रोजी औसा मतदारसंघातील मौजे जायफळ येथे नरेगाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या १७ लक्ष रू.च्या पाणी पुरवठा टाकी ते कोंड - शिव या शेतरस्त्याच्या कामाचा शुभारंभ औसा पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या सौ.रेखाताई नागराळे यांच्या शुभ हस्ते तर बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता जयंत जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले,या प्रसंगी मनसेचे औसा तालुका अध्यक्ष शिवकुमार नागराळे,तांत्रिक सहाय्यक अझर शेख, रोजगार सेवक राजेंद्र भोंग,सतिश जंगाले, प्रकाश भोंग,राम (आबा) भोंग,बाळू भोंग,राजेंद बोचरे,पांडूरंग जंगाले, अनिकेत जंगाले, संजय भोंग,नवनाथ भोंग ई...मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.या भागात शेतरस्त्याच्या बाबतीत शेतकर्याना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत,तसेच अनेक शेतक-यांना केवळ रस्त्या अभावी रासी शेतात ठेवाव्या लागत तर अनेक शेतकर्याच्या शेतातील सोयाबीनच्या गंजी चार-चार महीने शेतातच ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता,या पीकाचे कधी अवकाळी पावसामुळे नुकसान होत तर काही शेतकर्याच्या गंजीच्या-गंजी दुष्ट लोक द्वेशापोटी पेटवून देत,परंतू आजघडीला या मतदारसंघासह तालुक्यात अनेक ठिकाणी शेतरस्त्याच्या कामास सुरुवात झाली असुन हा अनेक दिवसाचा जटील प्रश्न मार्गी लागल्याने शेतकरी बांधव समाधान व्यक्त करत आहेत.तालुक्यात होत असलेली शेतरस्त्याची कामे दिसायला सार्वजनीक स्वरुपाची दिसून येत असले तरी याचा अनेक शेतक-यांना वैयक्तिक लाभ होत आहे.शिवली गणासह तालुक्यातील ज्या-ज्या गावात अशा प्रकाराची रस्ते करणे गरजेचे आहे त्या-त्या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक,रोजगार सेवक व शेतकरी वर्गासह त्या गावातील जाणकार मंडळी यांनी पुढाकार घेऊन रस्ता मजबुतीकरणाचे प्रस्ताव पंचायत समिती औसा कडे दाखल करावेत,या कामी पंचायत समितीचे,बांधकाम विभागाचे अधिकारी,नरेगाचे कर्मचारी हे अत्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य करत असून त्यांचे देखील आभार व कौतुक करावे तेवढे कमी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.