मागेल त्याला शेत रस्ता देणार आ. अभिमन्यू पवार आ. अभिमन्यू पवार यांची पत्रकार परिषद.

 मागेल त्याला शेत रस्ता देणार आ. अभिमन्यू पवार. 



आ. अभिमन्यू पवार यांची पत्रकार परिषद. 







औसा प्रतिनिधी  औसा विधानसभा मतदारसंघातील शेत तिथे रस्ता तयार करुन शेतकऱ्यांच्या अडचणी दुर करण्याचा प्रयत्न केला जात असून शेतरस्ता कामाचा हा औसा पॅटर्न राज्यात निर्माण केला जात आहे.शेत रस्त्याची हि संकल्पना पुर्ण झाल्यास शेतकरी समृद्ध होईल अशी प्रतिक्रिया आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली आहे.

    २५ दिवसांपुर्वी मतदारसंघातील अनेक गावात शेतरस्ते कामांचा शुभारंभ करण्यात आला.सध्या औसा तालुक्यात १२० व मतदारसंघातील निलंगा तालुक्यात ३० किलोमीटर लांबीच्या अंतराचे शेतरस्ते कामाचे मातीकाम व दबई काम पुर्ण झाली असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहे असे सांगून आ. अभिमन्यू पवार यांनी आपला स्थानिक विकास निधीतून शेवटचा शेतरस्ता होईपर्यंत शेत रस्त्यासाठी समर्पित केला जाईल.पाहिल्या टप्प्यात ६१ गावांतील रस्त्याची कामे हाती घेतली असून ८८५ किलोमीटर अंतराचे शेतरस्ते प्रस्तावित आहेत.शेतरस्ते अभावी शेतमाल पिकवून शेतकऱ्यांना शेतात ठेवावे लागत आहे.प्रत्येक शेताला रस्ता झाल्यास शेतमालाची ने आण करणे वेळेत, शेती पिकाची रास वेळीत होणे, शेतीची कामे वेळेत पूर्ण होणे कामास मदत होणार आहेत.शेतरस्तेमुळे शेतीची किंमतीत वाढ होईल तसेच शेती मालाची वाहतूक वेळीत करुन बाजारपेठत आणता येणार असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईल.शेतरस्त्याची कामे पूर्ण झालेल्या रस्त्यावर मातीकामानंतर लगेच मनरेगातून खडीकरण हाती घेण्यात येईल.पाणंद, शेतरस्ते व शिवरस्ता कामासाठी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा हे २० ते २५ पोकलेन मशीनची मदत करणार असल्याचे सांगून शेतरस्ते कामात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रशासन मामलेदार न्यायालयाव्दारे कायदेशीर कारवाई करुन शेतरस्ते मोकळे करुन देतील.मतदार संघात या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही पर्यायी उद्योजक व इतर लोकप्रतिनिधीकडून निधी उपलब्ध करु.असे आ. अभिमन्यू पवार यांनी यावेळी सांगितले.या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहू कांबळे,गटनेते सुनील उटगे,संतोषअप्पा मुक्ता,प्रा.भिमाशंकर राचट्टे,प्रा. शिव मुरगे,फहिम शेख आदी उपस्थित होते.


चौकट


औसा येथे आ. अभिमन्यू पवार व जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी औसा प्रशासकीय इमारत याठिकाणी शेतरस्ते संदर्भात एक बैठक घेवून या कामांचा आढावा घेतला याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना  शेतरस्ते कामात दिरंगाई करु नका अशी सुचना केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या